आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या जन्मानंतर ही कंपनी तुम्हाला देते 11 हजार रुपये, असा करा अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील मुलींचे प्रमाण चिंताजनकरित्या घटत असताना मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सरकारी पातळीवर मोठया प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहे. त्या आर्थिकदृष्टया सक्षम व्हाव्यात यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. यात आता खासगी क्षेत्रातील कंपन्याही मागे नाहीत. देशातील सगळ्यात मोठी हेल्थकेअर नेटवर्क कंपनी ऑक्सी भारतनेही यासाठी पाऊल उचलले आहे. कंपनीकडून मुलीचा जन्म झाल्यावर तिच्या नावावर 11 हजार रुपये जमा करण्यात येत आहे. ऑक्सी गर्ल चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोग्रॉम अंतर्गत नोंदणी करणाऱ्या पालकांना मुलीच्या जन्मानंतर 11 हजार रुपये देण्यात येत आहेत. 

 

 

कंपनी असे देते रुपये
- कंपनी मुलीच्या जन्मानंतर 11 हजार रुपये तिच्या नावावर बँकेत जमा करते. कंपनी चिमुकलीच्या नावे बचत खाते उघडून त्यात हे पैसे जमा करते. हे पैसे तुम्ही मुलगी 18 वर्षाची झाल्यावर काढू शकता. एवढेच नाही तर कंपनी मुलीच्या आईची आणि मुलीच्या आरोग्याची काळजीही घेते. 

 

 

पुढे वाचा: कुठे कराल अर्ज, कसा घ्याल योजनेचा लाभ

बातम्या आणखी आहेत...