आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅंकांतून पैसे काढण्याची घाई करताहेत लोक, वाढू शकतात मोदींच्या अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील दोन महिन्यामध्ये जास्त लोकांनी बॅंकांतून पैसे काढले आहेत. (फाइल) - Divya Marathi
मागील दोन महिन्यामध्ये जास्त लोकांनी बॅंकांतून पैसे काढले आहेत. (फाइल)

नवी दिल्ली. विधानसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण मागील दोन महिन्यापांसून लोक आपले बॅंकांमधील पैसे जास्तीत जास्त प्रमाणात काढू लागले आहेत. यामुळे सिस्टिमध्य करंसीचा सर्क्युलेशन तीव्र गतीने वाढले आहे. यामुळे आगमी दिवसांत कर्ज आणखी महाग होऊ शकते. याचा थेट परिणाम ईमआय आणि महाग कर्जाचा रुपात होणार आहे. याबाबातची भिती एसबीआयच्या एका रिपोर्टमध्य व्यक्त केली गेली आहे. मागील सप्ताहातच एसबीआय, पीएनबी, आयसीआयसीआय बॅंकेने कर्ज महाग केले होते. याशिवाय आरबीआय ने देखील महागाई वाढण्याचा अलर्ट दिला आहे. 

 


जानेवारी-फेब्रुवारीत जास्त काढले गेले पैसे 

स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या रिपोर्टनुसार लोक मागील दोन महिन्यांपासून तीव्र गतीने बॅंकामधील पैसे काढत आहेत. फक्त जानेवारीतच सिस्टिममध्ये करंसी सर्क्युलेशन 45 हजार करोड रुपयांनी वाढले आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये वाढून 51 हजार करोड झाले आहे. या दोन महिन्यातं करंसी सर्क्युलेशन सरासरी 10 हजार करोड रुपये ते 20 हजार करोड रुपये पर्यंत वाढत असते. रिपोर्टनुसार आगामी काही महिन्यांत मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे करंसी सर्क्युलेशन वाढण्याची भिती आहे. याचा थेट परिणाम बॅंकामधील डिपाॅझिटवर होणार आहे. बॅंका आपले डिपाॅझिट रोखण्यासाठी डिपाॅझिट रेटमध्ये वाढ करु शकता, ज्यामुळे लोन देखील महाग होऊ शकते. 

 


डिपाॅझिट ग्रोथ 5.9 टकक्यांवर 
एसबीआय रिपोर्टनुसार नोटबंदी लागू झाल्यानंतर बॅंकामध्ये डिपाॅझिट वाढले होते, ते आता हळूहळू कमी होत आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये डिपाॅझिट ग्रोथन उंच्चाक गाठत 15.6 टक्क्यांवर पोहचली होती. नंतर एप्रिल 2017 मध्ये घटून 10.9 टक्क्यांवर आली होती. आता फेब्रूवारी 2018 मध्ये हीच ग्रोथ 5.9 टक्क्यांवर आली आहे. बॅंकर सुनील पंत यांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात ही ग्रोथ आणखी कमी होऊ शकते. ज्याचा थेट परिणाम बॅंकामधील डिपाॅझिट इंटरेस्ट रेटवर होणार आहे. 

 


आरबीआय ने व्यक्त केली भिती 
 भारतीय रिजर्व्ह बॅंकने देखील फेब्रुवारीत सादर केलेल्या माॅनेटिरी पाॅलिसीमध्ये महागाई वाढण्याची भिती व्यक्त केली आहे. यामुळेच रेपो दरात कुठलाच बदल केला नव्हता. यानंतर मार्च मध्ये बॅंकांनी आपली कर्जे महाग केली. एसबीआय ने दो वर्षांनतर आपली कर्जाचे दर वाढविले आहेत. 
 

आणखी पाहण्यासाठी पुढील स्लाइडलवर क्लिक करा..


 

बातम्या आणखी आहेत...