आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Petrol Price: पेट्रोल, डिझेलची सलग 13 व्या दिवशी दरवाढ; क्रुड ऑईलच्या किंमती घसरल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ओपेक देशानंतर रशियानेही तेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजाराचे कच्च्या तेलाचे भाव घसरले आहे. दरात 2.70 टक्के घसरण झाली आहे. या दर घसरणीचा फायदा भारतीयांना मिळू शकतो. जाणकारांच्या मते दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. मागील काही दिवसापासून तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या   किंमती वाढवत आहेत. खरेतर कंपन्यांना कर्नाटकच्या निवडणुक काळात झालेले नुकसान त्या कंपन्या भरुन काढत आहेत. 

 

 

कंपन्या वेगाने वाढवत आहेत दर 
कर्नाटक निवडणुकीच्या काळात जवळपास तीन आठवडे पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. 12 मे रोजी कर्नाटकातील मतदान झाले. त्यानंतर 14 मे पासून तेल कंपन्यांनी रोज पेट्रोलचे दर वाढविणे सुरु केले. पेट्रोल-डिझेलच्या दरात 19 दिवस कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता त्यामुळे या कंपन्यांचे 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग असून डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने या कंपन्यांचे नुकसान होत आहे.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...