आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Petrol Price : सलग 14 व्या दिवशी पेट्रोलची दरवाढ, Petrol 15 पैशांनी तर 17 पैशांनी महाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलग 14 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. - Divya Marathi
सलग 14 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे.

नवी दिल्ली- पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 15 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 17 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 78.12 रुपयांनी मिळत आहे तर मुंबईत पेट्रोलचे दर 85 रुपये 96 पैशांवर पोहचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घसरल्यानंतरही ही इंधन दरवाढ सुरुच आहे.

 

 

कच्च्या तेलात सलग   दुसऱ्या दिवशी घसरण
सलग दुसऱ्या दिवशी तेलाच्या दरात घसरण सुरु आहे. जवळपास 20 टक्के दर वधारल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती घसरु लागल्या आहेत. मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी इंधनदराबाबत लवकरच दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचे आश्वासन दिले होते. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. परंतु दरांवर नियंत्रण आणण्यात सरकारला आतापर्यंत यश आलेले नाही. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकलं जात आहे.

 

 

केंद्र सरकारला जाग

पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे आता केंद्र सरकारला जाग आली आहे. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत.

 

पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...