आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Petrol Price : तब्बल 16 दिवसानंतर पेट्रोल, डिझेल अवघ्या एका पैशाने स्वस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तब्बल 16 दिवसानंतर पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घसरण झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 60 पैसे प्रति लिटर नव्हे तर एका पैशाने स्वस्त झाल्याचे इंडियन ऑईलने म्हटले आहे.  किमतींचा आढावा घेताना ही चुक झाल्याचे इंडियन ऑईलने म्हटले आहे. 

 

 

इंडियन ऑईलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही लिपिकाची चुकी असल्याचे म्हटले आहे. पेट्रोलची ही किंमत 25 मे रोजीची होती असे त्यांनी सांगितले.  दरम्यान मंगळवारी लखनऊ येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉलर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट केले होते. आता केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमती कमी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.

 

 

प्रमुख शहरात पेट्रोल-डिझेलचे दर 
दिल्ली-78.42 आणि डिझेल 69.30
मुंबई- 86.23 आणि डिझेल 73.78 रुपये
कोलकाता-81.05
चेन्नई-81.42

 

बातम्या आणखी आहेत...