आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पॉड' हॉटेलला लाभत आहे लोकप्रियता; वर्षभरात 10 हजाराहून अधिक जणांची भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंधेरी (पूर्व) येथे सुरु करण्यात आलेले ‘पॉड’ हॉटेल अर्बनपॉडला गेल्या एका वर्षात भेट देणाऱ्याची संख्या 10 हजाराहून अधिक आहे. विशेष म्हणजे अर्बनपॉडला भेट देणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड वैविध्य असून जगभरातील 40 हून अधिक देशांच्या नागरिकांनी अर्बनपॉडच्या सेवेचा लाभ घेतला आहे.

 

 

 

अर्बनपॉड प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक हिरेन गांधी यांनी याबाबत माहिती दिली, ‘‘यापूर्वी फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवाशांमध्ये पॉड हॉटेल्स लोकप्रिय होती. आता मात्र भारतीय प्रवासीही या नाविण्यपूर्ण संकल्पनेकडे आकर्षित होत आहेत. अर्बनपॉडच्या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे येणारा 30 ते 45 या वयोगटातील मोठ्या संख्येतील पर्यटक हे होय. अर्बनपॉडमध्ये मोठ्या संख्येने एकट्या महिला पर्यटक तसेच महिला व्यावसायिकही येत असतात. त्यांच्याकडून महिला पॉड्स विभागातील सुरक्षा, आरोग्यदायी वातावरण आणि आरामाला पसंती दिली जात असते. ‘पॉड’ हॉटेलने या उद्योगात मानाचा समजला जाणारा टॉप रेटेड आणि ‘सर्वोत्कृष्ट बुटीक हॉटेल ऑफ द इयर’ हा पुरस्कारही मिळवला आहे. या यशामुळे देशातील इतर शहरांमध्येही व्यवसायाचा विस्तार करण्याचा आमचा विचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.”

 

 

पुढे वाचा: पॉड हॉटेल्स म्हणजे काय

 

 

बातम्या आणखी आहेत...