आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेक्ट्रम \'चक्रव्यूह\' आणि प्राइस वाॅर मुळे टेलिकाॅम कंपन्या अडचणीत, दिलासा पॅकेज येईल कामी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली. स्‍पेक्‍ट्रमच्या कॅलक्युलेशनमुळे भारतीय टेलिकाॅम सेक्टर आता कुठे सावरलं होतं पण प्राइस वाॅरमुळे संपूर्ण इंडस्ट्रीच्या अडचणी वाढल्या आहेत. रिलायंस जिओची 2016 मध्ये इंट्री झाली आणि टेलिकाॅम इंडस्ट्रीचं गणित बिघडलं. जिओच्या सुरवातीच्या फ्री आॅफरपुढे एअरटेल, आयडिया, व्होडाफोनसारख्या कंपन्या टिकू शकल्या नाहित. या कंपन्यांचा नफा घटला. परिणाम असा झाला की 2जी स्कॅमनंतर सुद्धा एक्सपेंशन मोडमध्ये दिसणा-या या सेक्टर मध्ये कंसाॅलिडेशन येऊ लागलं. ब-याच कंपन्यांनी आपली आॅपरेशन्स बंद केली तर काही कंपन्यानी मर्जरची घोषणा केली. यामुळे हजारो लोकांच्या नोक-या गेल्या. आता दिलासा पॅकेज या इंडस्ट्रीच्या किती उपयोगी येईल हे पाहावे लागेल. 
 
 
टेलिकाॅम इंडस्ट्री मध्ये प्राइसवाॅर मुळे कंपन्यांचा नफा तीव्र गतीने घटला आहे. एक रिपोर्टनुसार, मागील वर्षी टेलिकाॅम इंडस्ट्रीशी संबंधित 40 हजार लोक बेरोजगार झाले आहेत, तसेच पुढील 5-6 महिन्यांत आणखी 90 हजार लोक बेरोजगार होऊ शकतात. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की 2जी घोटाळ्यानंतर सुप्रीम कोर्टाने सगळे 122 लायसन रद्द केले आहेत. यानंतर झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात अनेक कंपन्यांनी भाग घेतला नाही तर काहींनी भारतातून आपला बिजनेस गुंडाळला. 
 
 
इंडस्ट्री वर का आलं संकट ? 
 
मागील 1.5 वर्षात झाले खूप बदल 
फाॅर्च्यून फिक्सलचे डायरेक्टर जगदीश ठक्कर यांच्या म्हणण्यानुसार दिलासा पॅकेजमुळे थोडा दबाल कमी होईल पण रिलांयस जिओच्या प्रवेशाने इंडस्ट्रीवर जो दबाव निर्माण झाला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागेल. त्यांच्या म्हणण्यानुसार जिओ आल्यामुळे फ्री डाटा आणि व्हाईस काॅलचं प्राईस वार सुरू झालं कंपन्यांनी डाटा स्पीड चांगला ठेवण्यासाठी आणि व्हर्च्युअल नेटवर्क प्लॅटफाॅर्म मजबूत ठेवण्यासाठी काम सुरू केलं. यामुळे कंपन्यांचा वाढत राहिला तर त्यासोबत कर्ज वाढणे आणि मार्जिन कमी होण्याचा दबाव देखील वाढला. यामुळे इंडस्ट्रीत गुंतवणूक कमी झाली आणि जाॅबचं संकट देखील वाढलं. ह्याचा परिणाम कंसोलिडेशनच्या रुपात दिसू लागला आहे. कंपन्यांचा बिझनेस घटला आहे. 
 
कसा घटला दुस-या कंपन्यांचा नफा 
 
Airtel
 
तिमाही नफा घटला (%) एक वर्षापूर्वी  
Q1 2018 367 कोटी 75 % 1462 कोटी  
Q2 2018 343 कोटी  76% 1461 कोटी  
Q3 2018 306 कोटी 39% 504 कोटी  
Q4 2017 373 कोटी 71.7% 520 कोटी  
 
Idea
 
तिमाही नुकसान एक वर्षापूर्वी
Q1 2018 816 कोटी 217 कोटींचा फायदा
Q2 2018 1106 कोटी 91.5 कोटींचा फायदा
Q3 2018 1285 कोटी 384 कोटींचा फायदा 
Q4 2017 327.9 कोटी 451.9 कोटींचा फायदा

 

इंडस्ट्रीवर राहणार जिओचा दबाव 
ठक्कर यांनी सांगितले की इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा वाढली आहे. कंपन्या आत्ता देखील नवे-नवे आकर्षक प्लॅन आॅफर करताहेत. याचा सरळ अर्थ आहे की प्राइस वाॅर संपलेलं नाही. कमीत कमी अजून एक वर्ष सेक्टरवरचा दबाव कमी होणार नाही. नवीन गुंतवणूक किंवा दुस-्या प्रश्नांवर सरकार पुढे काय पाऊल उचलते ये पाहणं महत्वाचं ठरेल. 
 
कशामुळे आहे दिलाशाची प्रतिक्षा 
टेलिकॉम इंडस्ट्रीने लायसन फी आणि स्पेक्ट्रम यूजेस चार्जेस कमी करणे, जीएसटी रेट कमी करण्याची मागणी, आॅटोमॅटिक मधून 100 टक्के एफडीआय युनिव्हर्सल सर्विसेस आॅब्लिगेशन फंड लेबीला हटवण्याची मागणी सरकारला केली होती. पण या मुद्द्यांवर इंडस्ट्रीला कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. सध्या टेलिकाॅम आॅपरेटर्सना 18 टक्के जीएसटीसहित 29 ते 32 टक्के टॅक्स 8 टक्के लायसन फी आणि 3 ते 6 टक्के स्पेक्ट्रम यूजेस चार्ज द्यावा लागतो. 
 
50 हजार कोटींच्या गुंतवणुकीची आवश्यकता 
घरगुती रेटिंग एजन्सी 'इकरा'च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की टेलिकाॅम सेक्टरला स्टेबल करण्यासाठी प्रत्येक वर्षी 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणक आवश्यक आहे. इकराच्या रिपोर्टनुसार टेलिकाॅम सेक्टरवर दबाव वाढण्याचं प्रमुख कारण जिओ मुळे वाढलेली स्पर्धा आहे. टेलिकाॅम इंडस्ट्री अडचणीतून वाटचाल करत आहे. यामुळे आर्थिक वर्ष 2018 मध्ये इंडस्ट्रीचा नफा कमी होऊ शकतो. 
 
सरकारचे 6.5 कोटींच्या गुंतवणूकीचं उद्दिष्ट 
सरकारला नॅशनल टेलिकाॅम पाॅलिसी 2018च्या माध्यमातून आर्थिक दबावात असणा-या इंडस्ट्रीत पुन्हा ग्रोथ होण्याची आशा आहे. ट्राय ने नॅशनल टेलिकाॅम पाॅलिसी 2018ची सिफारस करताना म्हटले होते की याचा उद्देश या सेक्टरमध्ये 2022 पर्यंत 100 अब्ज डाॅलर म्हणजेच 6.5 कोटींची गुंतवणुकर करण्याचा आहे. तसेच या पाॅलिसीचा उद्देश या सेक्टरमध्ये 20 नव्या 20 लाख नोक-या निर्माण करणे आहे. 
 
इंडस्ट्रीत नोक-यांचं संकट 
प्राइस वाॅर मुळे कंपन्यांचा नफा घटला आहे. यामुळे हजारो लोकांच्या नोक-या गेल्या आहेत तसेच पुढे देखील 80 ते 90 हजार नोक-या जाणार आहेत. CIEL HR सर्विसेसच्या रिपोर्टनुसार मागील वर्षी टेलिकाॅम इंडस्ट्रीशी संबंधित 40 हजार लोक बेरोजगार झाले. रिपोटमध्ये मध्ये दवा केला गेला आहे की पुढील 5-6 महिन्यांत मोठ्या प्रमाणात नोक-्यांत कपात होऊ शकते. 
 
पुढे वाचा दिलासा पॅकेज उपयोगी येईल काय
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...