आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजार गायांनी सांभाळला देश, मोठया संकटात सापडला होता कतार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगातील श्रीमंत देशांमध्ये समावेश असलेल्या कतारने एक वर्षापुर्वी निर्णय घेतला नसता तर आता तेथील लहान मुले ताजे दुध आणि दुग्धजन्य पदार्थापासून दुरावली असती. एक वर्षापुर्वी जगात या देशाने गो-पालनाबाबत विचारही केला नव्हता. या देशाला आता या निर्णयावर गर्व वाटत आहे. आज हा देश दुधाबाबत कोणावरही अवलंबून नाही. मोठ्या प्रमाणावर तेलसाठा असणाऱ्या कतारची शेजारी देशांनी नाकेबंदी केली आहे. दुधाबाबत कतार पुर्णपणे सौदी अरबवर अवलंबून होता.

 

 

5 जून रोजी करण्यात आली नाकेबंदी
गतवर्षी पाच जून रोजी सौदी अरब, युएई, बहरिन आणि इजिप्तने कतारशी सर्व प्रकारचे संबंध तोडले. यामुळे दुधासहित अनेक गरजेच्या वस्तूचा पुरवठा बाधित झाला. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या संकटाची चाहूल लागल्याने कतारने अमेरिकेतुन उच्च प्रतीच्या गायी मागवल्या. कतार एअरवेजच्या फ्लाईटने या गायी आणण्यात आल्या. या वाळवंट असलेल्या देशात या गायींसाठी एअरकंडिशनर असलेल्या गौशाळा बनविण्यात आल्या. मशिनींच्या मदतीने या गायींचे दुध काढण्यात येते. आता या देशात 10 हजार गाया आहेत.

 

 

पुढे वाचा: योग्य वेळी निर्णय घेतला नसता तर...
 

बातम्या आणखी आहेत...