आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने घेतलाय हा मोठा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबर्ई-  उन्हाळी सुट्ट्यांची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. गावी आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्यांची गर्दी रेल्वे आणि एसटी स्थानकावर वाढू लागली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पन्नास मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना जादा डबे जोडण्याचा जाहीर केला आहे. 

 

 

उत्तर भारत, कोकण, गोवा, कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना हे जादा डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे जवळपास दहा हजार अतिरिक्त प्रवाशांची सोय होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर आता गावी जाण्यासाठी गर्दी वाढते आहे. एप्रिल अखेरीस सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे तर कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या सगळ्या एक्सप्रेस फुल्ल झाल्या होत्या. पहाटेच्या वेळेत सुटणाऱ्या गाड्या तसेच अधिक तिकीट दर असलेल्या डबलडेकर, तेजस एक्स्प्रेसमधील या काळातील प्रतीक्षा यादीही वाढल्याचेही रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले होते. शनिवार, 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीतील तेजस एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, एलटीटी-मडगाव डबलडेकर एसी, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस आदी गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले होते. यामुळेच रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...