आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात श्रीमंत मंदिराने मागितली RBI कडे मदत, दानपात्रात 25 कोटींच्या जुन्या नोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्या होत्या. ज्यांच्याजवळ या नोटा होत्या त्या बदलण्यासाठी बॅंकामध्य सोय केलेली होती. पण याचवेळी भारतातील सर्वात श्रीमंत तिरुपती बालाजी मंदिराच्या दानपात्रात जवळ जवळ 25 कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा आढळल्या आहे. याबाबत मंदिर प्रशासाने मदतीसाठी आरबीयला पत्र लिहिले आहे. 

 
 
भक्तांनी दानपात्रात अर्पण केल्या जुन्या नोटा 
मंदिर प्रशासनानुसार, नोटा बदलण्याची मुदत संपल्यानंतर देखील हुंडीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आढळ्या आहेत. याच नोटांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने आता आरबीआयकडे मदत मागितली आहे. काही लोकांनी कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून या मंदिराच्या दानपात्रात जुन्या नोट्या टाकल्याचे बोलले जात आहे. 
 
पुढे वाचा आरबीआय ने काय दिले उत्तर 

बातम्या आणखी आहेत...