आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Zingat Dance करणाऱ्या डब्बू अंकलला मिळाली Ad, या कंपनीसोबत झाला करार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोशल मीडियावर एका अंकलचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. खुदगर्ज या हिंदी चित्रपटातील 'आप के आ जाने से' या डान्समुळे ते चांगलेच फेमस झाले. हा व्हिडीओ लाखो लोकांनी सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. बॉलीवूडकरांनाही हा डान्स चांगलाच आवडला. संजीव श्रीवास्तव यांना मुंबईहून सुनील शेट्टीचा कॉल आला. त्यांना भेटण्यासाठी मुंबईला बोलविण्यात आले. रविवारी 3 जून रोजी दुपारी 3 वाजता संजीव श्रीवास्तव यांनी सुनील शेट्टी यांची भेट घेतली. त्यानंतर श्रीवास्तव यांना सिनेसृष्टीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. 

 

 

याच दरम्यान डब्बू अंकल यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ते शानदार डान्स करताना दिसत आहेत. हा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते आता Bajaj Allianz सोबत करार करत आहेत. या व्हिडीओत डब्बू अंकल Bajaj Allianz च्या जिंगल 'समझो हो गया'वर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ स्वत: संजीव श्रीवास्तव यांनी स्वत: ट्विटरवर शेअर केला आहे. 

 

 

श्रीवास्तव हे मध्य प्रदेशातील भोपाळमधील भाभा विद्यापीठात प्राध्यापक असून विदिशा येथे राहणारे आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना नृत्याची लहानपणापासुन आवड आहे.  त्यांनी अनेक स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. त्यांना याची प्रेरणा मिथुन चक्रवर्ती यांच्याकडून मिळाली. त्यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ 12 मे रोजीचा आहे. त्यावेळी त्यांनी लग्नात डान्स केला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...