आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Career Sarkari Naukri In Indian Railway For The Post Of Male Constable And Female Constable

Indian Railway: 10 वी पास महिला, पुरुषांसाठी Constable च्या 8619 पदांसाठी भरती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने महिला आणि पुरुष कॉन्स्टेबलच्या 8619 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 30 जून ही अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख आहे. या जागांसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करु शकतात. महिलांसाठी 4, 216 पदे असून पुरुषांसाठी 4,403 पदे आहेत. या पदांसाठी 21,700 रूपये एवढे वेतनमान आहे. या पदांसाठी लिखित परिक्षा होणार असून ती सप्टेंवर अथवा ऑक्टोबर महिन्यात होईल.   

 

 

पदाचे नाव: कॉन्स्टेबल  (महिला आणि पुरूष)

 

पदांची संख्या (8,619 पदे)


महिलांची पदे : 4,216 
पुरूषांची पदे : 4,403

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून, 2018

 

वेतनमान: 21,700 रूपये

 

वयाची मर्यादा:
1 जुलै 2018 रोजी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्ष असावे. जास्तीत जास्त वय हे 25 असावे.

 

वयात सूट:
एससी, एसटी अर्जदारांना वयात 5 वर्षांची सूट
ओबीसींना (नॉन क्रिमीलेयर) वयात 3 वर्षांची सूट

 

शारीरिक माप (पुरूष)
उंची: 165 सेमी
छाती : 85 सेमी (फुगवल्यानंतर)

महिलांची उंची: 157 सेमी

 

अर्ज कसा कराल
अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. 

 

परीक्षा शुल्क
यासाठी तुम्हाला 500 रूपये परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे.
एससी, एसटी, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याकांसाठी 250 रूपये शुल्क.

 

निवड प्रक्रिया
अर्ज करणाऱ्यांची निवड ऑनलाईन संगणक आधारित चाचणीद्वारे होईल. निवड झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...