आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert: SBI मध्ये असेल अकाउंट तर कुणाला सांगु नका आईचे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारी क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने आपल्या  17 कोटी डेबिट कार्ड होल्डर्सला अलर्ट जारी केला आहे. एसबीआयने आपल्या डेबिट कार्ड होल्डरर्सला सांगितले आहे की त्यांनी आपल्या आईचे आडनाव कोणासोबत शेअर करु नये.

 

 

याचे कारण असे आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या डेबिट कार्डाचा पासवर्ड रिसेट करता तेव्हा तुमचा सिक्युरिटी क्वेशन हा तुमच्या आईचे आडनाव किंवा पेट नेम असते. त्यामुळे तुम्ही ही बाब कोणाबरोबरही शेअर करु नका. असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. हॅकर्स तुमचे अकाउंट या माहितीच्या आधारे सहज हॅक करु शकतात. 

 

 

इंटरनेट बँकिंगसाठी वापरा स्ट्रॉग पासवर्ड
SBI के मॅनेजिंग डायरेक्‍टर, रिस्‍क आयटी अॅण्ड सब्सिडियरीज दिनेश खारा यांनी सांगितले की, तुम्ही जर इंटरनेट बँकिंगचा वापर करत असाल तर तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड गोपनीय ठेवा. नेहमी स्ट्रॉग पासवर्ड वापरा. अनेकदा लोक सोपा पासवर्ड निवडतात कारण त्यामुळे त्यांना ते लक्षात ठेवणे सोपे जाते. पण यामुळे अकाउंट हॅक होण्याची शक्यता वाढते. कारण सरळ पासवर्ड सायबर क्राईम करणारे सहज क्रॅक करतात. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा.

 

 

आयटीचा सुरक्षित वापर गरजेचा
आपण रस्त्यावर वाहन चालवताना आणि चालताना अपघात होऊ नये याची काळजी घेत असतो. तसेच आपण इंटरनेट बँकिंगचा किंवा आयटी संबंधित सेवांचा फायदा घेताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. 

 

 

बँकांनी फ्रॉडमध्ये गमावले 17,000 कोटी रुपये
आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये बँकांनी फ्रॉड प्रकरणांमुळे 17,000 कोटी रुपये गमावले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली. अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेच्या फ्रॉड मॉनिटरिंग कमेटीच्या रिपोर्ट्च्या आधारे ही माहिती दिली.  
 

बातम्या आणखी आहेत...