Home »Business »Business Special» Sbi Reduces Charges For Non Maintenance Of Average Minimum-Balance

SBI ने MAB पॅनल्टी 75 टक्क्यांपर्यंत केली कमी, 25 कोटी खातेधारकांना होणार फायदा

दिव्य मराठी वेब टीम | Mar 13, 2018, 14:27 PM IST

नवी दिल्ली.देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट आॅफ इंडिया (SBI) ने सेव्हिंग अकाउंटमध्ये मंथली अव्हरेज बॅलंस (MAB) मेंटेन न केल्यामुळे लावण्यात येणा-या पॅनल्टीत भरघोस कपात केली आहे. बॅंकेने हा चार्ज 75 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. आता एसबीआयच्या ग्राहकांना 15 रुपये प्लस जीएसटी या व्यतिरिक्त जास्त पॅनल्टी भरावी लागणार नाही. ग्राहकांना आतापर्यंत 50 रुपये अधिक जीएसटी अशी पॅनल्टी भरावी लागत होती. याचा लाभ ग्राहकांना एक एप्रिलपासून मिळणार आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे बॅंकेच्या 25 कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे.


मेट्रो आणि शहरी भागांमध्ये SBI च्या कस्टमर्ससाठी आधी 50 रुपये प्लस जीएसची अशी होती ती आता 15 रुपये प्लस जीएसटी आहे. तसेच निमशहरी वह ग्रामीण भागातील कस्टमर्ससाठीची पॅनल्टी 40 रुपये प्लस जीएसटी अशी होती ती आता 12 आणि 10 रुपये प्लस जीएसटी केली आहे.

मेट्रो आणि शहरी ब्रॅंच ( मासिक बॅलंस 3000 रु)नवी पॅनल्टीसध्याची पॅनल्टी
50% पर्यंत बॅलंस कमी झाल्यावर10 रु30 रु
50% पेक्षा जास्त आणि 75% पेक्षी कमी असल्यावर12 रु40 रु
75% पेक्षा जास्त बॅलंस कमी असल्यावर15 रु50 रु
निमशहरी ब्रॅंच (सरासरी मासिक बॅलंस 2000 रु)
50% पर्यंत कमी झाल्यावर7.50 रु20 रु
50% ते 75% बॅलंस कमी झाला तर10 रु30 रु
75% पेक्षा जास्त बॅलंस कमी असल्यावर12 रु40 रु
ग्रामीण ब्रॅंचमध्ये (सरासरी मासिक बॅलंस 1000 रुपये)
50% पर्यंत बॅलंस कमी झाल्यावर5 रु20 रु
50%पेक्षा जास्त आणि 75% पेक्षा कमी असल्यावर7.5 रु30 रु
75% पेक्षा जास्त बॅलंस कमी असल्यावर10 रु40 रु

(नोट- पॅनल्टीचे नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होतील, यावर जीसएटी वेगळा द्यावा लागेल)

1,771 कोटींची पॅनल्टी वसूल केल्यावर बॅंकेवर झाली होती टीका

अर्थमंत्रालयाने ने जानेवारी महिन्यात जारी केलेल्या आकड्यावरुन एप्रिल ते नोव्हेंबर 2017 पर्यंत एसीबीआयने 1,771कोटींची MAB पॅनल्टी वसूल केल्याचे समोर आले होते. यामुळे बॅंकेवर खूप टीका झाली होती. यानंतर बॅंकेने पॅनल्टी कमी करण्याचे संकेत दिले होते.


कस्टमर्सच्या फिडबॅकची घेतली दखल

मंथली बॅलंस पॅनल्टी कपातीवर SBI रिटेल व डिजीटल बॅंकिंगचे एमडी पी. के गुप्ता यांनी सांगितले, बॅंकेने कस्टमर्सकडून मिळालेल्या फिडबॅक विचारात घेऊन ही कपात केली आहे. बॅंक नेहमीच कस्टमर्सना प्राध्यान्य देत आहे.

या अकाउंट्स ना MAB मधून आहे सूट

गुप्ता यांनी पुढे सांगितले, एसबीआयने आपल्या कस्टमर्सना रेग्युलर सेव्हिंग बॅंक अकाउंटला बेसिक सेव्हिंग अकाउंट (BSBD) मध्ये शिफ्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. BSBD अकाउंट मध्ये मंथली मिनीमम बॅलंस असण्याचा नियम लागू होत नाही.


याशिवाय प्रधानमंत्री जन धन योजना, स्माॅल अकाउंट्स, पेंशनर्स, मायनर्स आणि सगळे सोशल बेनिफिशियरीज अकाउंट्ससारखे सेव्हिंग अकाउंटसना MAB अनिवार्य नाही. याशिवाय 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्टूडेंस अकाउंटला पर ही सूट आहे.

Next Article

Recommended