आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 66 रुपयात सुरु करा स्वत:चा व्यवसाय, या कंपनीने दिली ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सिंगापूर येथील एक ई-कॉमर्स कंपनी तुम्हाला व्यवसायाची संधी देत आहेत. या अंतर्गत तुम्ही केवळ 1 डॉलर (66 रुपये) मध्ये ऑनलाईन दुकान उघडू शकता. तुम्ही 66 रुपये खर्च करून या ऑफरचा तीन महिने फायदा घेऊ शकता. ही ऑफर देणाऱ्या कंपनीचे नाव शॉपमॅटिक असे आहे. 

 

 

तुम्हाला मिळेल ही सर्विस
या अंतर्गत ई-कॉमर्स कंपनी तुम्हाल ऑनलाईन स्टोर तयार करुन देईल. त्यासाठी ते तुम्हाला त्याचे टूल्स, इन्वेंट्री प्रबंधन, ऑर्डर घेणे आणि पूर्ण करणे, प्रोसेस करणे आणि पेमेंट स्वीकारणे या सारख्या सेवा देईल. 

 

 

तीन महिन्यानंतर येईल 1320 रुपयांचा खर्च
शॉपमॅटिक प्रो सॉल्यूशनद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये कस्टमराईज स्टोअर बिल्डिंग, पेमेंट गेट वे इंटीग्रेशन, शिपिंग आणि लॉजिस्टिक इंटग्रेशन, डाटा इनसाईट्स आणि प्रमोशन टूल्सचा समावेश आहे. पहिल्या तीन महिन्यानंतर तुम्हाला 20 डॉलर म्हणजेच 1320 रुपये आकारण्यात येतील.

 

 

पुढे वाचा: भारतीयांमध्ये व्यावसायिकतेच्या क्षमता

बातम्या आणखी आहेत...