आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mudra Loan: घ्यायचे असेल 50 हजार ते 10 लाखाचे कर्ज तर करु नका या चुका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हाला नवा व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा तुमच्या असलेल्या व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर तुम्ही कर्ज घेता. आज आम्ही तुम्हाला मुद्रा योजनेच्या कर्जासाठी अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती देणार आहोत. 

 

क्रेडिट हिस्‍ट्रीची घ्या काळजी
जर तुम्ही मुद्रा लोन घेणार असाल तर याकडे लक्ष द्या की बॅंक कर्ज देताना बँक तुमची क्रेडिट हिस्ट्री पाहते. त्यामुळे तु्म्ही तुमचे कर्जाचे हफ्ते, क्रेडिट कार्डाचे पेमेंट वेळेवर केले आहे की नाही हे पाहा. यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होऊ शकतो. मुद्रा लोनसाठी अर्ज करण्यापुर्वी तुमचा सिबिल स्कोर सुधारण्याचा प्रयत्न करा.

 

दस्तावेज
जर तुम्हाला नवा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्याकडे असलेली शैक्षणिक, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची कागदपत्रे नीट ठेवा. हे दस्तावेज कर्जाच्या अर्जासोबत जोडा. पण जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कर्ज हवे असेल तर तुमची बॅलेन्स शीट, कर प्रमाणपत्र, व्यवसाय प्रमाणपत्र चेक करा.

 

अर्ज करताना घ्या ही काळजी
कर्जासाठी अर्ज करताना ही बाब लक्षात घ्या की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्याची थोडी तरी माहिती तुम्हाला असायला हवी. पण तुम्हाला तुम्ही ज्या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी कर्जासाठी अर्ज करत आहात त्याची माहिती नसेल तर तुमचा अर्ज कॅन्सल होऊ शकतो.

 

बॅंक स्टेटमंटकडे द्या लक्ष
मुद्रा योजनेसाठी अर्ज करताना तुमच्या बॅंक स्टेटमंटकडेही लक्ष द्या. तुमच्या बॅंक स्टेटमंटमध्ये काही गडबड आढळल्यास बँक तुम्हाला कर्ज नाकारु शकते.

 

 

पुढे वाचा: 10 लाखाचे कर्ज घेणार असाल तर...

बातम्या आणखी आहेत...