आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2500 रुपयात शिकू शकता Business Tips, सरकार देत आहे Training

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- युवकांना स्वयंरोजगारास प्रेरित करण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत सरकार केवळ कर्ज व अनुदान देत नसुन युवकांना व्यावसायिक प्रशिक्षणही देत आहे. हे प्रशिक्षण वेगवेगळ्या सरकारी संस्था देत असतात. यापैकीच एक असणाऱ्या नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनकडून (NSIC) इन्‍क्‍यूबटर ट्रेनिंग कॅलेंडर 2018-19 जारी करण्यात आले आहे. यात NSIC कडून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास कार्यक्रम चालविण्यात येत आहे.

 

 

चला NSIC च्या या कार्यक्रमाविषयी विस्ताराने जाणून घेऊ यात.

 

सहा आठवड्यांचा कार्यक्रम
NSIC उद्योजकता विकास कार्यक्रम सहा आठवड्यांचा आहे. तो दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सुरु होतो. तुम्ही त्यासाठी अगोदरच प्रवेश घेऊ शकता.

 

काय आहे उद्योजकता विकास कार्यक्रम
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमातंर्गत ते सर्व प्रशिक्षण देण्यात येते जे एका व्यावसायिकासाठी आवश्यक असते. यात उद्योग कसा सुरु करावा आणि विकसित करावा याचा समावेश असतो. यामध्ये एका प्रोडक्टचे डिझाईन, निर्मिती प्रक्रिया, तपासणी, गुणवत्ता नियंत्रण, उपकरणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, मार्केटिग टिप्स, किंमत, एक्सपोर्ट, निधी उभारणी, सरकारी योजना, व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश असतो.

 

 

पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...