आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या घरी कामासाठी असेल बाई तर करावे लागेल हे काम, नाहीतर होऊ शकतो दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-जर तुमच्या घरी कामासाठी मोलकरीण असेल तर तुम्हाला सोशल सिक्युरिटी अकाउंट उघडावे लागेल. अकाउंटमध्ये मोलकरणीला प्राव्हडेंट फंड, पेंशन शिवाय अन्य सामाजिक सिक्युरिटी सुविधा मिळतील. केंद्र सरकारने सोशल सिक्युरिटी कोड 2018 चा ड्राफ्ट तयार केला आहे, तो लवकरच संसदेत सादर केला जाईल, संसदेची मंजुरी मिळताच हा कोड लागू होईल. 

 

मोलकरणीचे उघडावे लागेल विश्वकर्मा कर्मिक सुरक्षा खाते
सोशल सिक्युरिटी कोडच्या मसुद्यात नमूद केले आहे की जर एखादे कुटूंब घरकामासाठी मोलकरीण ठेवत असेत तर कुटूंब प्रमुखाला सोशल सिक्युरिटीसाठी तिची नोंद करणे करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तिचे विश्वकर्मा कर्मिक सुरक्षा खाते देखील उघडावे लागेल. हे खाते मोलकरणीच्या आधारला लिंक होईल. याशिवाय हे खाते पोर्टेबल असेल. उदा: जर एखादी मोलकरीण दिल्लीत काम करत असेल तर जर ती नंतर पश्चिम बंगालमध्ये जाऊन काम करु लागली तर तिला सोशल सिक्युरिटीसाठी दुस-यांदा खाते उघडावे लागणार नाही.  तिचे आधीचेच विश्वकर्मा सुरक्षा खाते उपयोगात येईल. 
 

रजिस्ट्रेशन केले नाहीतर भरावा लागेल दंड 
 या कोड मध्ये जर कुटूंबप्रमुखाने दिलेल्या मुदतीत मोलकरीचे सोशल सिक्युरिटी अकाउंट उघडले नाही तर दंडाचा प्रस्ताव आहे. इथे मोलकरीणाला कामावर ठेवणा-या परिवारा एम्प्लाॅयर मानले आहे. तसेच सरकार मोलकरणीला देखील स्वत: सोशल सिक्युरिटी खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करुन देईल. 
 

पुढे वाचा कसे करावे लागेल रजिस्ट्रेशन

 

 

बातम्या आणखी आहेत...