आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसात अडकली तुमची कार तर लक्षात ठेवा एक्सपर्ट्सने सांगितलेल्या या 4 Tips

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - पावसाळ्यात कार ड्राइव्ह करताना अनेकदा काही अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्याचे कारण म्हणजे, रस्त्यावरील खड्डे, स्पीड ब्रेकर किंवा एखादा रस्ता जो तुम्हाला माहिती नसेल. अशावेळी स्वतःला सुरक्षित कसे करावे यासाठी अॅटो एक्सपर्ट टूटू धवन यांनी काही टिप्स दिल्या आहेत. 

1. तुमची गाडी जोरदार पावसात अडकली किंवा अशी वेळ आली तर ड्रायव्हरने घाबरू नये. ड्राइव्ह करताना स्पीड स्लो ठेवा. पहिल्यांदाच एखाद्या रस्त्यावरून जात असाल तर बस, ट्रक किंवा एखाद्या मोठ्या गाडीच्या मागे तुमची कार किंवा गाडी असू द्या. पावसात कारचे सर्व लाईट सुरू करायला विसरू नका. 


2. रस्त्यावर पाण्याची पातळी कारच्या ग्राऊंड क्लिअरन्स एवढी असेल तर त्याठिकाणाहून हळू हळू पुढे जा. कार शक्यतो पहिल्या गीअरमध्ये चालवा. अशावेळी मायलेजचा फार विचार करता कामा नये. डिझेल गाडी असेल तर अधिक लक्ष द्यावे लागेल. कारण पाणी एअर क्लीनरमध्ये गेले तर गाडी बंद होते. अशा परिस्थितीत मोठे नुकसान होऊ शकते. 


3. पाऊस जास्त असेल आणि कार बंद पडली किंवा अडकण्याची शक्यता असेल तर कारला धक्का देऊन जवळपास पार्क करा. पाण्याची पातळी वाढत असेल तर कारच्या बाहेर येऊन सुरक्षित ठिकाणी उभे राहा. मदत मिळेपर्यंत त्याचठिकाणी थांबा. कारमध्ये बसून राहिले आणि मोठी गाडी जवळून गेली तर व्हायब्रेशनमुळे कारचे नुकसान किंवा तुम्हाला नुकसान पोहचू शकते. 

 

4. कारमध्ये पाणी गेल्याने इंजीनबरोबरच इतर इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सही काम करणे बंद करू शकते. अशावेळी पावरविंडो, सेंट्रल लॉकिंग काम न करण्याचीही शक्यता असते. असावेशी दरवाडे, खिडकी न उघडण्याची शक्यता असते. अशा स्थितीचा सामना करण्यासाठी कायम कारहॅमर सोबत ठेवा. अडचणीच्या काळात ते कामी येते. 

 

बातम्या आणखी आहेत...