आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितके अंतर जाल तेवढाच द्यावा लागेल टोल, जाणून घ्या नवा नियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टोलबद्दल नागरिकांमध्ये असणारा रोष लक्षात घेऊन आता सरकार नवे नियम तयार करत आहे. त्यामुळे आता टोलसाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागणार नाही. तुम्ही जेवढ्या अंतरासाठी प्रवास करणार आहात तेवढ्याच अंतराचा टोल आता तुम्हाला द्यावा लागणार आहे.  

 


सध्या तुम्हाला एका ठराविक टप्प्याचे पूर्ण टोल शुल्क द्यावे लागते. सरकारने आता यावर उपाय शोधून काढला आहे. जितके अंतर प्रवास केला तेवढाचा टोल घ्या अशी नागरिकांची मागील अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. पण तांत्रिक अडचणी सांगत सरकार असे करता येत नसल्याचे सरकारचे म्हणणे होते. आता जियो फेंसिंगद्वारे हे शक्य होणार आहे. एनएचएआयने याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून त्याला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. 

 

 

नव्या सिस्टिममध्ये काय होणार?
- जेव्हा कोणतेही वाहन राष्ट्रीय महामार्गावरुन धावेल तेव्हा त्याच्या मुव्हमेंटला ट्रॅक केले जाईल. त्यानंतर जेवढा प्रवास हे वाहन करील तेवढाच टोल आकारला जाईल. सरकार जियो फेंसिंग मॉडेल बनविणार असून ग्लोबल पोजिशनिंग किंवा रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेटिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कोणत्याही मोबाईल डिव्हाईसने महामार्गाच्या क्षेत्रात प्रवेश केल्यावर सॉफ्टवेअर सिस्टिम त्याच्या मुव्हमेंटला ट्रॅक करते. 

 

 

पुढे वाचा: बदलेल टोल प्लाझाचे कनेक्शन...

बातम्या आणखी आहेत...