आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 हजारात सुरु करा हा बिझनेस, कर्जाचे 4 लाख रुपये होतील माफ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला कमी पैशात स्वतःचा बिझनेस सुरु करण्याची इच्छा असल्यास तुम्ही केवळ 50 हजार रुपयात बिझनेस सुरु करू शकता, ज्यासाठी सरकार तुम्हाला 55 टक्के लोन आणि 40 टक्के सबसिडी देईल. म्हणजेच तुम्हाला जवळपास 4 लाख रुपये परत करावे लागणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला या स्कीम विषयी सविस्तर माहिती सांगत आहोत. यामुळे तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरु करणे शक्य होईल.


काय आहे स्कीमचे नाव 
सर्वात पहिले या स्कीमचे नाव जाणून घेऊ. या स्कीमला कॉयर (COIR) उद्यमी योजना म्हटले जाते. ही स्कीम मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मिडीयम एन्टरप्राजेस (एमएसएमई)च्या कॉयर बोर्ड द्वारे चालवण्यात येत आहे. या योजनेचा हेतू तरुणांना सेल्फ एम्‍प्‍लॉयमेंट आणि कॉयर प्रॉडक्ट्सला प्रमोट करणे असा आहे. कॉयर म्हणजे काथ्या किंवा नारळाच्या जटा. मल्याळम भाषेत काथ्याच्या दोराला कायारु (Kayaru) म्हणतात व या शब्दाचाच इंग्रजीमध्ये कॉयर (Coir) अर्थ होतो.
 

काय आहे स्कीम 
या स्कीम अंतर्गत बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला प्रोजेक्ट कॉस्टच्या 5 टक्के गुंतवणूक करावी लागते. शिल्लक प्रोजेक्ट कॉस्टचे 55 टक्के कर्ज बँक देते आणि 40 टक्के पैसा भारत सरकार सबसिडी स्वरूपात देते.

 
काय आहे लिमिट
या स्कीमनुसार प्रोजेक्ट कॉस्टची जास्तीत जास्त लिमिट 10 लाख रुपये आहे. म्हणजेच तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंतच्या प्रोजेक्ट कॉस्टचा बिझनेस सुरु करू शकता.


पुढे वाचा, कोणता बिझनेस करू शकता तुम्ही...

बातम्या आणखी आहेत...