आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Start Pearl Farming Business With Investment Of Rs 2 Lakhs Earn More Than 1 Lakhs Monthly

Pearl farming : दरमहा कमवा एक लाख, मोतीच्या शेतीचे हे आहेत फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- थोडी गुंतवणूक आणि अधिक नफा अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मोतीची शेती हा एक चांगला पर्याय आहे. दोन लाख रुपयांची गुंतवणूक करुन तुम्ही दरमहा एक लाखाचे मासिक उत्पन्न मिळवू शकता. यासाठी वेळ आणि स्क्लिची गरज असते. दीड वर्षानंतर जेव्हा मोती तयार होतो. तेव्हा तुम्ही अॅव्हरेज एक लाख रुपये मासिक उत्पन्न मिळवू शकता. सध्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोत्याला चांगलीच मागणी आहे. दर्जानुसार एक मोती 250 रुपये ते 15 हजार रुपयात विकला जातो.  

 

 

अशी होते मोती शेती
इंडियन पर्ल कल्चरचे संस्थापक अशोक मनवानी म्हणाले की, मोती शेती ही जशीच केली जाते जसे कोणतेही नैसर्गिक उत्पादन तयार केले जाते. तुम्ही शेतात 1000 वर्गफुटाचा तलाव करुन ही शेती करु शकता. तलाव बनविल्यानंतर तुम्ही यासाठी आवश्यक शिंपले बाजारातून किंवा मत्यालयातून घेऊ शकता. दर्जानुसार हे शिंपले तुम्हाला 1.5 ते 5 रुपयात पडते. तुम्ही हे शिंपले 2-3 दिवस तलावात ठेवू शकता. या काळात या शींपाच्या मांसपेशी ढिल्या होतात आणि सहज सर्जरी होऊ शकते. अशा रितीने तुम्ही शींपाची सर्जरी करुन तुम्ही तुम्हाला हव्या असणाऱ्या डिझाईनची फ्रेम टाकू शकता. यानंतर तुम्ही नायलॉनच्या बॅगमध्ये शिंपले भरुन ते पाण्याने भरलेल्या भांड्यात दहा दिवसासाठी ठेवा. या पाण्यात अॅण्टीबायोटिक्सही टाका. या दरम्यान रोज तपासणी करा. कारण या शिंपल्यांचा मृत्यू होऊ शकतो.

 

 

10 दिवसानंतर तलावात टाका शिंपले
मनवानी यांनी सांगितले की, सुरुवातीला 10 दिवस अॅण्टीबायोटिक पाण्यात राहिल्यानंतर जे शिंपले जीवंत राहतात त्यांना तलावात टाकण्यात येते. या शिपल्यांना नायलॉनच्या बागेत ठेवून (एका बँगेत दोन शिंपले) बांबू किंवा पाईपाच्या सहाय्याने तलावात एक मीटर खोल पाण्यात लटकविण्यात येते. लक्षात ठेवा कोणताही शिंपला असा राहायला नको जो बाबूंला लटकलेला असून पूर्णपणे पाण्यात असेल. अधुनमधून नैसर्गिक खाद्य तलावात टाकत जावे. या शिंपल्याचे आरोग्य चांगले राहते. त्यात मोती बनण्याची प्रक्रियाही वेगाने होते. सुमारे दीड वर्षानंतर शिंपले बाहेर काढून त्यातून मोती बाहेर काढण्यात येतात. 

 

 

मासिक एक लाखापर्यंत मिळू शकते उत्पन्न
एजंटच्या मार्फत हे मोती विकल्यास एका मोत्यास 250 से 500 रुपये मिळू शकतात. तुम्ही स्वत: ते बाजारात विकल्यास हा आकडा 600 ते 800 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. आपल्या देशात मोती खरेदीचे व्यवहार मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, सुरत या शहरात जास्त होतात. मोती शेतीच्या एका लॉटमध्ये 2-4 उच्च दर्जाचे मोती मिळतात. या सगळ्यामुळे तुमचे सरासरी मासिक उत्पन्न एक लाख रुपये होते. सर्वसाधारणपणे मोती गोल असतात. शिंपल्यात डिझाईन फ्रेम टाकल्यास कोणत्याही डिझाईनचे मोती तयार होऊ शकतात. याला किंमतही जास्त मिळते. महाराष्ट्रात 12 ते 15 महिन्यात मोती तयार होतात.

 

 

मोतीच्या शेतीचे सरकार देते ट्रेनिंग
इंडियन काउंसिल फॉर अॅग्रीकल्चर रिसर्च (ICAR) ची CIAF विंग (सेंट्रल इंस्‍टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर अॅक्‍वाकल्‍चर) मोती शेतीचे मोफत ट्रेनिंग देते. 15 दिवसाचे हे ट्रेनिंग भुवनेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर देण्यात येते. या सर्जरी सहित पुर्ण प्रोसेस शिकविण्यात येते. तुम्हाला हे मोफत ट्रेनिंग घ्यायचे असेल तर तुम्ही CIAF च्या 0674 - 2465421, 2465446 या क्रमांकावर संपर्क साधा. सरकारकडून या शेतीसाठी कर्जही मिळते. नाबार्ड आणि अन्य व्यावसायिक बँका विशेष व्याजदरावर 15  वर्षासाठी कर्ज देतात. केंद्र सरकारकडून सब्सिडीच्या वेगवेगळ्या योजनाही चालविण्यात येतात.   

 

 

20 हजार कोटीचा बाजार
मोत्यांची जागतिक स्तरावरील बाजारपेठ ही 20 हजार कोटींची आहे. भारत दरवर्षी जवळपास 50 कोटी रुपयांचे मोती इम्पोर्ट करतो. तर एक्सपोर्ट 100 कोटीहून अधिक रुपयांचा आहे.     

 

 

बातम्या आणखी आहेत...