आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू आणि बीअर दुकानांच्‍या परवानगीसाठी ऑनलाइन अर्जास सूरूवात, 28 तारखेपर्यंत आहे संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्‍तर प्रदेश सरकारने देशी-विदेशी दारू आणि बिअरच्‍या दुकानांच्‍या  परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहे. 2018-19 या वित्‍तीय वर्षासाठी हे अर्ज मागवण्‍यात आले आहे. दोन टप्‍प्‍यांमध्‍ये हे अर्ज मागवण्‍यात येणार आहे. 20 तारखेपासून या प्रक्रियेस सुरूवात होणार आहे.


पहिल्‍या टप्‍प्‍यात 28 फेब्रुवारीपर्यंत आहे अर्ज करण्‍याची संधी
आयकर विभागाच्‍या प्रमुख सचिव श्रीमती कल्‍पना अवस्‍थी यांनी सांगितले की, पहिल्‍या टप्‍प्‍यात 20 फेब्रुवारीपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्‍याकाळी 7 वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज करता येणार आहे. 5 मार्च रोजी यासंबंधीच्‍या ई-लॉटरीला सुरूवात होणार आहे.


दुस-या टप्‍प्‍यात 7 मार्चपासून ते 12 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. 14 मार्चला ई-लॉटरी सुरू होईल. कल्‍पना अवस्‍थी यांनी सांगितले की, ई-लॉटरीमध्‍ये अर्ज करण्‍यासाठी निर्धारित वेबसाईटवर लॉग इन करून रजिस्‍ट्रेशन करावे लागणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...