आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Success Story: कधीकाळी कॅन्टीनमध्ये धुत होते भांडी, आज सागर रत्नाचे मालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हाला जर दक्षिण भारतीय पदार्थ आवडत असतील तर सागर रत्ना रेस्टॉरंटबद्दल तुम्हाला निश्चितच माहिती असेल. ही रेस्टॉरंट साखळी सुरु करणारी व्यक्ती कधीकाळी केवळ 18 रुपये वेतनावर एका कॅन्टीनमध्ये प्लेट धुत होती. पण काही तरी करुन दाखविण्याच्या इच्छेच्या जोरावर ते एका मोठ्या आणि फेमस रेस्टॉरंटच्या साखळीचे मालक झाले. जयराम बानन हे सागर रत्ना रेस्टॉरंट चैनचे मालक आहेत. 

 

 

वडिलांच्या भितीने सोडले होते घर
जयराम बानन यांचा जन्म मंगलोरजवळ (कर्नाटक) 'उडुपी' येथे झाला होता. त्यांचे वडील ड्रायव्हर होते. ते तापट स्वभावाचे होते. अनेकदा चुकी केल्यावर त्यांच्या वडीलांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली होती. जयराम बानन शाळेत परिक्षेत नापास झाल्यावर वडील मारतील या भितीने ते वयाच्या 13 व्या वर्षी 1967 साली ते घरातून पळून मुंबईला आले. 

 

 

8 रुपयांपासून सुरु केली नोकरी
अनेक दिवस मुंबईत फिरल्यानंतर जयराम यांना एका लहान कॅन्टीनमध्ये नोकरी मिळाली. ते तिथे टेबल पुसण्यापासून भांडी धुण्यापर्यंतची कामे करत होते. 

 

 

मुंबई ते दिल्लीचा प्रवास
जयराम हे उड्डपी समुदायाशी निगडित आहेत. याच समाजाने मुंबईकरांना मसाला-डोसाची ओळख करुन दिली. मुंबई, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात असलेली तीव्र स्पर्धा लक्षात घेऊन बानन यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.  1973 मध्ये जयराम मुंबईहून दिल्‍लीला गेले. दिल्लीत त्यांचा भाऊ एक उडुपी रेस्‍टोरंटमध्ये काम करत होता. दिल्लीत गेल्यावर बानन यांनी 1974 मध्ये सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्‍सच्य कॅन्टीनचे टेंडर घेतले.

 

 

पुढे वाचा: कसे सुरु केले पहिले आउटलेट
 

 

बातम्या आणखी आहेत...