आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवित्र मक्का शहराला रतन टाटा देणार ही भेट, सौदी म्हणाले सुभान अल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- द इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड (IHCL) पवित्र शहर मक्का या ठिकाणी एका मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू करत आहे. IHCL ला ताज या ब्रँन्ड नावानेही ओळखले जाते. ताज ही टाटा समूहाची कंपनी आहे. त्याचे चेअरमन (Emeritus) रतन टाटा आहेत. ही कंपनी सौदीतील मक्का येथे 340 खोल्यांचे लक्झरी हॉटेल उभारत आहे. कंपनीने सांगितले की, 340 खोल्याच्या या हॉटेलची उभारणी किंग अब्दुल अजीज रोड (केएआर) परियोजनेअंतर्गत करण्यात येत आहे. हा प्रकल्प मक्केचे रुप पालटणारा असेल. एका प्रवक्त्याने सांगितले की,  IHCL चे प्रबंध निदेशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित छटवाल आणि उम्म अल कुरा वरिष्ठ कार्यकारी अधिकारी हिशम एबीद यांच्या दरम्यान या संबंधात एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

 

 

पुढे वाचा: कधी उघडणार हॉटेल

बातम्या आणखी आहेत...