आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TCS ने रचला इतिहास, 7 लाख कोटीचे मार्केट कॅप पार करणारी देशातील पहिली कंपनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी TCS ने नवा इतिहास रचला आहे. 7 लाख कोटीचे मार्केट कॅप पार करणारी ती देशातील ती पहिली कंपनी ठरली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीतील उत्तम निकाल आणि रुपया कुमकुवत झाल्याने टीसीएसच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. बीएसईवर शेअर   1.54 टक्के वाढून 3,661.90 रुपयांवर पोहचल्याने TCS चा मार्केट कॅप 7,00,992.97 कोटी रुपये झाला. गुरूवारी कंपनीचा मार्केट कॅप 6,90,062.38 कोटी रुपये होता.

 

 

52 आठवड्यातील नवा उच्चांक
रुपयांच्या कुमकुवत झाल्याने मागील दोन दिवसात TCS च्या शेअरमध्ये तेजी आली आहे. मागील दोन दिवसात शेअरमध्ये 5 टक्के वाढ झाली आहे. शुक्रवारी सुरुवातीलाच शेअर 0.39 टक्क्यांनी वाढला. कामकाजादरम्यान 1.92 टक्क्यांनी वाढून 3,674 रुपयांच्या भावावर पोहचला. हा 52 आठवड्यातील नवा उच्चांक आहे.   

बातम्या आणखी आहेत...