आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • This Lone City Of Japan Is Still Waiting For Its Habitats

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरं, आॅफिस-मॉल सगळं आहे पण लोकच नाहीत, 7 वर्षांनंतर व्हायरल झाले Horror Pics

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या मशीन्स चालवणारं आता कुणीच या शहरात नाही - Divya Marathi
या मशीन्स चालवणारं आता कुणीच या शहरात नाही

नवी दिल्ली. या शहरात घरं, आॅफिसेस रेस्टाॅरंट्स माॅल म्युझिक लायब्रररी, ब्युटी पार्लर सगळं काही आहे. जे काही वर्षांपुर्वी होते तसंच आज देखील आहे, फक्त लोकच नाहीत. एक फेमस फोटोग्राफरने या शहरावर एक डाक्युमेंट्री तयार केली आहे सध्या ती पूर्ण जगभरात फेमस होत आहे. या डाक्युमेंटरीमध्ये कधीकाळी इथं राहणा-या लोकांची कहाणी दाखवली आहे ती तुमचं हृदय पिळवटून टाकते. 

 

ही घटना 11 मार्च 2011 रोजी दुपारी घडली होती,जपानच्या ओशिका शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर 9 रिश्टर तीव्रतेचा भुकंप झाला. भुकंपाचं केंद्र 24 किलोमीटर खोलीवर होतं पण त्यामुळे त्सुनामी आली होती. वीस मिनिटांनतर सुनामीच्या लाटा उत्तरेतील होककायदो आणि दक्षिणेतील ओकीनावा बेटावर आदळल्या आणि तिथं हाहाकार उडाला. 

 

या भयंकर प्रलयात 15,000 मृत पावले, यानंतर या विशाल लाटा फुकशिमा दायचे अणू वीज केंद्रात घुसल्या अणू संयंत्रात समुद्राचं पाणी घुसल्याने रिअक्टर वितळू लागले आणि मोठे स्फोट होऊ लागले. संयत्रामुळे अणू विकिरण झाले त्यामुले आसपासचा परिसर रिकामा करवा लागला. फोटोग्राफर कार्लोस आयस्ता आणि गुआलियम ब्रेसन यांच्या टीम ने हे शहर आपल्या कॅमर-यात कैद केलं आहे. 

 

पुढे पहा सात वर्षांनतर असं दिसतं शहर....