आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्यात टोमॅटोचे दर अर्ध्यावर, किरकोळ बाजारात 8 रूपये किलो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने गगनाला भिडलेले टोमॅटोचे दर महिनाभरात अर्ध्यावर आले आहेत. सप्टेंबरमध्ये टोमॅटो ३१५० रुपये तर गेल्या महिन्यात ८०० रुपये क्विंटल होते. आज शनिवारी मात्र टोमॅटोचे दर एकदम ४०० रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.  किरकोळ बाजारातही याचे दर ५ ते ८ रुपये किलोवर आल्याने सर्वसामान्य ग्राहकांची मात्र चांदी होत आहे. दरम्यान, परराज्यातून मागणी आली तर टोमॅटोला चांगला दर मिळण्याची शेतकऱ्यांना अास लागली आहे.  


दीड महिन्यात भाजीपाल्याच्या भावात होत असलेल्या चढ-उताराने शेतकरी त्रासला आहे.  औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत एक ऑगस्ट रोजी टोमॅटोची ७३ क्विंटल आवक झाल्याने दर ३५०० रुपयांवर पोहोचले होते. १६ ऑगस्टला अवघा ६३ क्विंटल टोमॅटो आला. दर ३३५० रुपये झाले.  सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वदूर पावसामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीच्या भीतीने माल काढला. यामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटो आणि  अन्य भाज्या बाजारात दाखल झाल्या.  औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत १६ सप्टेंबर रोजी तब्बल १३५ क्विंटल टोमॅटो दाखल झाले. आवक वाढल्याने दर ८५० रुपयांवर घसरले.  १० डिसेंबर रोजी टोमॅटोची आवक घटूनही दाखल झालेल्या ७९ क्विंटल टोमॅटोला ८०० रुपयांचा दर मिळाला.

 

होलसेलमध्ये दर घसरल्याने किरकोळमध्ये घट
होलसेलमध्ये दर घसरल्याने किरकोळ बाजारातही टोमॅटोचे दर घसरले आहेत. टोमॅटो ५ ते ८ रुपये किलो दराने विकले जात आहेत. दरम्यान, आता शेतकऱ्यांच्या अाशा अन्य राज्यांकडून येणाऱ्या मागणीकडे लागल्या आहेत. तेथे माल पाठवण्यास सुरुवात झाली तर टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यापारी सोमनाथ वाकळे यांनी वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...