आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. अॅप बेस्ड टॅक्सी सर्व्हिस देणा-या आला आणि उबेर या कंपन्याचे कॅब ड्रायव्हर 18 मार्चच्या रात्रीपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाणार आहेत. या संपात दिल्ली, मुंबई, पुणे बंगलुरु आणि हैद्राबादमधील ड्रायवर सामिल होणार आहेत. यामुळे या शहरांतील लोकांची अडचण होणार आहे.
याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे संजय नाईक यांनी सांगितले, ज्यांनी 5 ते 7 लाख रुपये गुंतवले होते त्यांना प्रतिमहिना 1.5 लाख रुपये कमाईची आशा होती. ओला-उबेरने त्यांना दरमहा एवढी कमाई होईल हेआश्वासन दिले होते, पण अर्धीदेखील कमाई होत नाही. हे सगळं ओला व उबरेच्या मिसमॅनेजमेंटमुळे होत आहे. मुंबईमध्ये 45,000कॅब्स आहेत पण स्लोडाऊन मुळे व्यवसायात 20 टक्के घट झाली आहे.
ड्रायव्हर आणि कंपन्यांची चर्चा निष्फळ
सूत्रांनुसार ड्रायव्हर आणि कंपन्यांमधील चर्चा निष्फळ ठरली आहे. कॅबचालकांनी सोमवारी सकाळपासून आपली डिव्हायसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यादिवशी फक्त कंपनीद्वारेच चालवल्या जाणा-या कॅब लोकांसाठी उपलब्ध असतील. या कॅबची संख्या फार कमी आहे.
या शहरांत होईल परिणाम
या संपाचा दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, बंगलुरु, गुरुग्राम, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद या शहरांबरोबरच अन्य शहरांत परिणाम होईल. या शहरांध्ये जास्तीत जास्त लोक आॅफिसला येण्या-जाण्यासाठी कॅबचा उपयोग करतात. ड्रायव्हर सोमवारी ओला-उबेरच्या आॅफिस बाहेर आपल्या कुटुंबियांसोबत आंदोलनदेखील करणार आहेत.
ड्रायव्हरांच्या या आहेत मागण्या
ड्रायव्हरांचं म्हणण आहे की, त्यांच्या उत्पन्नात सातत्याने घट होत आहे. युनियनेने अनेक मागण्या केल्या आहेत. यामध्ये ड्रायव्हर्सना पहिल्या सारखा कमीत कमी 1.25 लाखांचा व्यवसाय मिळावा. कंपनीद्वारे चालवण्यात येणा-या कॅब बंद कराव्या. ज्या ड्रायव्हरांना कस्टमर्सनी कमी रेटिंग दिले आहे त्यांना परत कामावर घेतले जावे, तसेच गाडीच्या किमती नुसार भाडे निश्चित करण्यात यावे.
110 शहरांत सर्व्हिस
ओलाची देशातील 110 शहरांमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करते तर उबेर 25 शहरामंध्ये उपलब्ध आहे. ओलाने रोज 20 लाख लोक प्रवास करतात. तर 10 लाख लोक रोज उबेरची टॅक्सी वापरतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.