आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Petrol साठी सरकारला व्हेनेझुएलाकडून दोन मोठया ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वेगाने वाढत आहेत. देशातंर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे सरकारवर अबकारी शूल्क कमी करण्यासाठी मोठा दबाब आहे. अशा वेळी व्हेनेझुएलाने भारताला दोन मोठ्या ऑफर दिल्या आहेत. त्यामुळे भारताला स्वस्तात कच्चे तेल भेटू शकते. व्हेनेझुएलाजवळ मोठ्या प्रमाणावर तेलसाठे आहेत. भारतातही तेलाचा मोठा खप आहे. 

 

 

पहिली ऑफर- मेच्या पहिल्या महिन्यात
व्हेनेझुएलाने अरब देशांपेक्षा 30 टक्के स्वस्त कच्‍च्या तेलाची ऑफर दिली आहे. त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. ती अट म्हणजे यासाठी जी किंमत द्यावी लागेल ती भारताने क्रिप्टो करंसी पेट्रो मार्फत द्यावी. आपली क्रिप्‍टोकरंसी  मजबूत करण्यासाठी व्हेनेझुएलाने अशी ऑफर अनेक देशांना दिली आहे. पेट्रो ही कोणत्याही देशाने जारी केलेली पहिली व्हर्चुअल करंसी आहे जिचा उपयोग पेट्रोलच्या खरेदी विक्रीसाठी केला जाऊ शकतो. व्हेनेझुएलाने आपल्याकडे असलेला तेलसाठा लक्षात घेऊन ही करंसी सुरु केली आहे. जवळपास 300 अब्ज बॅरलसोबत व्हेनेझुएलाकडे जगातील सगळात मोठा तेलसाठा आहे.

 

 

दुसरी ऑफर- मे महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात
व्हेनेझुएला तेलाच्या मोबदल्यात रुपयात पेमेंट घेण्यास तयार आहे. भारतातील व्हेनेझुएलाचे राजदूत अगस्तो मोंटियल यांनी म्हटले आहे की, असे केल्याने दोन्ही देश अमेरिकेकडून घालण्यात आलेले निर्बंध तोडू शकतात. या प्रतिबंधामुळे व्हेनेझुएलाच्या तेल उत्पादनात घट झाली आहे.

 

व्हेनेझुएलाचे म्हणणे आहे की, भारताने तेल खरेदी करावे आणि पेमेंट रुपयांमध्ये करावे. या पैशाने व्हेनेझुएला भारताकडूनच औषधे आणि खाण्या-पिण्याच्या वस्तू खरेदी करणार आहे. व्हेनेझुएलाने असाच सौदा तुर्की, चीन आणि रशियासोबत केला आहे. अनेक ठिकाणी विरोध केल्याने अमेरिकेने व्हेनेझुएलावर व्यापारी प्रतिबंध लावले आहेत. 

 

 

पुढे वाचा: पेट्रोलचे दर कोणत्या दिशेने...

बातम्या आणखी आहेत...