आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरिल्‍ला ग्‍लास: नावाला भुलू नका, खरेदी करण्याआधी विचारा नंबर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. जर तुम्हाला एखाद्या स्मार्टफोनच्या खासियतविषयी विचारलं तर आपण फोनच्या अन्य गोष्टींसोबतच गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनचा देखील उल्लेख करता. गोरिल्ला ग्लास असलेला स्मार्टफोनची स्क्रीन साधारण फोनच्या तुलनेत जास्त मजबूत आणि टिकाऊ मानली जाते. पण हे तुम्हाला माहित नाही की गोरिल्ला ग्लासच्या नावावार विकल्या जाणा-्या प्रत्येक फोनची स्क्रीन एकसारखी मजबूत नसते. 

 

याबाबत टेक एक्सपर्ट अजेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की मार्केटमध्ये आत्तापर्यंत गोरिल्ला ग्लासचे अनेक व्हर्जन आले आहेत. त्यांना नंबरवरुन ओखळले जाते. प्रत्येक नंबरची क्षमता वेगवेगळी असते. जास्त पैसे मोजून सुद्धा त्या क्वालिटीचं प्रोटेक्शन मिळत नसेल तर फोन घेण्याआधी याबद्दल माहिती करुन घेणं गरजेचं असतं. 


गोरिल्ला ग्लास काय आहे ? 

सामान्य मटेरिअलपासून बनवलेल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनचा हार्डनेस जास्त नसतो त्यामुले एखाद्या टोकदार वस्तूच्या आघातामुळे ती स्क्रीन फुटण्याचा धोका असतो. साधारणपणे याला स्क्रीनवर स्क्रॅचेश येणे म्हटले जाते. गोरिल्ला ग्लासपासून बनलेल्या स्क्रीनच्या बाबतीत दावा केला जातो की कुठल्याही टोकदार वस्तूच्या आघात झाल्यानंतरही काॅम्प्रेस्ड काचेच्या स्क्रीनचं नुकसान होत नाही. काही वेळा उंचावरुन पडल्यानंतर ही तुमच्या फोनला काही होत नाही. गोरिल्ला कठोर आणि स्पेशल पद्धतीने तयार केला गेलेला ग्लासचा ब्रॅंड आहे. ही ग्लास corning कंपनी बनवते. याचसारखा टणक ग्लासचा ड्रॅगनटेल ग्लासचा देखील एक ब्रॅंड आहे. काही अन्य कंपन्या अन्य ब्रॅंडच्या नावाने या प्रकारच्या ग्लास बनवतात. 


किती स्क्रॅचेश सहन करू शकते गोरिल्ला ग्लास ?

जगभरात हार्डनेस मोजण्याचे एक स्केल असते याला mohs scale of hardness म्ह्टलं जातं. या स्केलनुसार जो पदार्थ जास्त मजबूत असतो तितका त्याचा वरचा नंबर असतो. दुनियातील सगळ्यात कठोर धातू हिरा आहे. यामुळे या स्केलनुसार डायमंडचा नंबर 10 आहे. या स्केलच्या हिशेबानुसार गोरिल्ला ग्लास 6.5 स्केलचे स्क्रॅचेश सहन करू शकते. म्हणजेच 6 किंवा 6.5 हार्डनेस असलेला पदार्थ या ग्लासवर आदळला तर ग्लासला इजा होणार नाही. यामुळे यावर चाकू, नाणे पडल्याने किंवा कित्येक वेळा फोन पडल्यानंतर देखील स्क्रीन खराब होत नाही. 

 

mohs scale of hardness स्‍केल 
 
1 Talc 
2 Gypsum 
3 Calcite  
4 Fluorite 
5 Apatite 
6 Orthoclase 
7 Quartz  
8 Topaz
9 Corundum 
10 Diamond 
 
आणखी माहिती वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...