आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींना का राहावे लागले होते दोन दिवस गॅरेजमध्ये, वाचा धीरुभाईंचे काही किस्सा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा आज स्मृतीदिन आहे.  6 जुलै 2002 रोजी धीरुभाईंनी जगाचा निरोप घेतला होता. धीरुभाई अंबानी यांनी अगदी शून्यातून हजारो कोटींचे विश्व निर्माण केले. त्यांच्या यशोगाथेचे अनेक किस्से आपण ऐकलेले आहे. शिस्त हा त्यांच्याकडे असलेला एक महत्त्वाचा गुण होता. तशीच शिस्त आपली मुले अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांनाही असावी ही धीरुभाईंची इच्छा होती. त्यासाठी एकदा तर त्यांनी मुलांना चक्क गॅरेजमध्ये दोन दिवस राहण्याची शिक्षा दिली होती. 


नेमके काय घडले...
धीरुभाई आणि त्यांची दोन मुले मुकेश आणि अनिल यांच्याबरोबरचा अनेक वर्षे जुना असा हा किस्सा आहे. त्यावेळी मुकेश अंबानी 10-11 तर अनिल अंबानी 9 वर्षांचे होते. अंबानींच्या घरी त्यावेळी पाहुणे येणार होते. मुकेश आणि अनिल हे दोघे त्यादिवशी फारच मस्ती करत होते. घरात इकडून तिकडे पळणे, सोफ्यावर उड्या मारणे असा त्यांचा नुसता धिंगाणा सुरू होता. मुकेश यांच्या आई म्हणजे कोकिलाबेन पाहुण्यासाठी विविध पदार्थ तयार करत होत्या. पण मुकेश आणि अनिल ते आधीच खाऊन घेत होते. हा सर्व प्रकार धीरुभाई पाहत होते. त्यांनी बराचवेळ शांतपणे ते पाहिले आणि काहीवेळाने दोन्ही मुलांना आता मस्ती पुरे झाली असे सांगितले. पण मुकेश आणि अनिल त्यादिवशी मस्तीच्या मूडमध्ये होते. त्यांचा हा सर्व धिंगाणा सुरूच राहिली. 


दुसऱ्या दिवशी सकाळी धीरुभाईंनी अनिल आणि मुकेश यांना बोलावून घेतले. आधीच्या दिवशी दोघांनी घातलेल्या मस्तीमुळे ते प्रचंड चिडलेले होते. धीरुभाई त्यांना म्हणाले, तुम्ही आता लगेच घराबाहेर जा. आजपासून पुढचे दोन दिवस तुम्ही दोघांनी घराच्या गॅरेजमध्ये राहायचे आहे. जोपर्यंत तुम्हाला कसे वागायला हवे हे कळत नाही आणि पश्चाताप होत नाही, तोपर्यंत तुम्ही तिथेच राहाल. त्यावेळी कोकिलाबेन यांनी दोघांना शिक्षेपासून वाचवण्याचा बराच प्रयत्न केला. पण धीरुभाई ऐकले नाहीत. अखेर मुकेश आणि अनिल यांना दोन दिवस त्या गॅरेजमध्ये राहावे लागले. त्यांना फक्त जेवण आणि अंगावर पांघरून दिले जात होते. त्यानंतर आयुष्याला शिस्तच लागली असे मुकेश अंबानींनी एका मुलाखतीत सांगितले होते. 

 

पुढे वाचा, धीरुभाईंशी संबंधित काही गाजलेले किस्से...