आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली. परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन इनकम टॅक्स टॅक्स डिपार्टमेंट द्वारे जारी केलेला एक 10 अंकांचा युनिक अल्फा न्युमरिक नंबर आहे. याला पॅन कार्ड असेही म्हणतात. आजकाल बॅंक अकाउंट सुरु करण्यासापासून इनक टॅक्स रिटर्न जमा करण्यापर्यंत ब-याच कामांसाठी पॅन आवश्यक आहे. सरकारने ब-याच प्रकारच्या ट्राझेंक्शनसाठी देखील पॅन अनिवार्य केले आहे. आम्ही तुम्हाला पॅन कार्ड कुणाकुणासाठी आवश्यक आहे याबद्दल सांगणार आहोत.
वार्षिक 2.5 लाखांपेक्षा जास्त इनकम असणा-यांसाठी
इनकम टॅक्स डिपार्टमेंटनुसार जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला पॅन आवश्यक आहे. इनक टॅक्स अॅक्टच्या सध्याच्या नियमानुसार 2.5 लाखांपर्यंतच्या कमाईवर टॅक्स लावला जाऊ शकत नाही पण यापेक्षा जास्त कमाई असेल तर टॅक्स भरावा लागतो. याशिवाय 2.5 रुपयांपेक्षा जास्त इनकम असणा-यांसाठी इनकम टॅक्स रिर्टन फाइल करणे देखील गरजेचे आहे. नियमानुसार तुम्ही पॅनकार्ड शिवाय इनकम टॅक्स रिटर्न फाइल करु शकत नाही.
पाच लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय असेल तर
जर एखादा व्यक्ति व्यवसाय करत असेल आणि तो प्रोफेशनल सेवा देत असेल आणि त्याची मागील वर्षी विक्री टर्नओव्हर आदी मिळून उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याच्याकडे पॅन असणे आवश्यक आहे.
एक्सपोर्टर आणि इंपोर्टरसाठी
कुठल्याही एक्सपोर्टर आणि इंपोर्टरसाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. या शिवाय त्याला व्यवसाय करणे अवघड असते.
आणखी वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.