आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक महिन्याला बॅंक अकाउंटमधून पैसे नाही काढले तर सरकारच्या रडारवर याल तुम्ही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- प्रत्येकाचं कुठल्या न कुठल्या बॅंकेत अकाउंट असंत. लोक त्यात आपल्या सोयीनुसार पैसे जमा करतात किंवा काढतात. ही एक साधारण प्रॅक्टिस आहे. जर तुमचं बॅंक अकाउंट आहे आणि त्यात पैसे जमा करत आहात पण त्यातून पैसे काढत नसाल तर तुम्ही सरकारच्या रडारवर आहात. सरकार सध्या बॅंक अकाउंट्सची पाहणी करत आहे. आज आम्ही तुम्हाला बॅंक अकाउंटमधून पैसे काढणे का महत्वाचे आहे हे सांगणार आहोत. 


प्रत्येक महिन्याला पैसे नाही काढले तर काय होईल?

तुम्ही पैसे तर खर्च करत आहात पण ते तुमच्या बॅंक अकाउंटमधून न काढता, तर तुम्ही सरकारच्या नजरेत संशयित ठरू शकता. सीए अमरजीत चोपडा यांनी सांगितले, जर तुम्ही रोजच्या गरजांसाठी आणि अन्य गोष्टींसाठी पैसे खर्च करत असाल तर त्या हिशोबानुसार  बॅंक अकाउंटची विड्राॅल हिस्टरी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पैसे नाही काढले तर तुमच्याकडे अन्य मार्गाने पैसा येत असल्याचा संशय निर्माण होतो. 
 

ब्लॅकमनी तर नाही ना ?

अमरजीत चोपडा यांच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या व्यक्तीची बॅंक अकाउंटची विड्राॅल हिस्टरी नसेल तक आयकर विभाग त्या व्यक्तीस नोटीस जारी करुन खर्चासंबंधी तपशील विचारू शकतो. तुमच्या खर्चाचा सोर्स काय याची माहिती मागवली जाऊ शकते. 
 
पुढे वाचा टॅक्स प्रोफाइल होईल चेक 

बातम्या आणखी आहेत...