आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 रुपयांची नोकरी, मालकाच्या मुलीसोबत लग्न, ही आहे येदियुरप्पांची स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामागे एक चेहरा मानला जातो तो म्हणजे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचा होय. त्यांच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये कर्नाटकात सगळ्यात पहिल्यांदा भाजपचे सरकार सत्तेत विराजमान झाले होते. आताही तेच मुख्यमंत्री होतील असा दावा करण्यात येत आहे. त्यांचे लग्न ते राजकीय जीवन या प्रवासावर आपण नजर टाकूयात...

 


#1- राइस मिलमध्ये क्‍लार्क म्हणून केले काम:

 

मांड्या जिल्ह्यातील बुकानाकेरे येथे 27 फेब्रुवारी 1943 रोजी लिंगायत परिवारात येदियुरप्पा यांचा जन्म झाला. वयाच्या 4 थ्या वर्षी त्याचे मातृछत्र हरपले. 1965 मध्ये येदियुरप्‍पा यांनी पहिली नोकरी केली. ही नोकरी सोशल वेल्फेअर डिपार्टमेंटमध्ये फर्स्ट डिव्हिजनल क्लार्कची होती. तेथे मन रमत नसल्याने त्यांनी ही नोकरी सोडली. येदियुरप्पा शिकारीपूरामध्ये आले आणि त्यांनी वीरभद्र शास्त्री यांच्या राईस मिलमध्ये क्लार्कची नोकरी पत्करली.

 

 

#2- मिल मालकांच्या मुलीसोबत केले लग्न:

 

शिक्षण पर्ण केल्यावर येदियुरप्पा हे नोकरीच्या शोधात होते. त्यांचे मित्र, म्हैसुर येथील अभियंता शिवाकुमार यांनी त्यांची भेट वीरभद्र शास्त्री यांच्यासोबत घडवून आणली. शास्त्री यांनी त्यांना क्लार्क म्हणून कामास ठेवले. नंतर येदियुरप्पा यांच्यासोबत त्यांनी आपल्या मुलीचा विवाह लावून दिला. मित्रा देवी यांचा 2004 मध्ये मृत्यू झाला.

 

पुढे वाचा...

 

बातम्या आणखी आहेत...