आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण आणि नोकरीसाठी देखील घेऊ शकता विनातारण कर्ज, असा मिळवा लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सरकारकडून बिझनेस सुरू करण्यासाठी विना तारण दोन कोटींपर्यंत कर्ज दिले जाते, पण ब-याच लोकांना माहित नाही की सरकार बिझनेसशिवाय देखील विना तारण कर्ज देते. यामध्ये शिक्षण आणि स्कील डेव्हलेमेंटशिवायइतर दोन प्रकारच्या कर्जाचा समावेश आहे ज्याची गॅरंटी सरकार घेते. म्हणजेच तुम्हाला कर्ज घेण्यासाठी तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. मिनिस्ट्री आॅफ फायनांस च्या अंतर्गत नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनी (एनसीजीटीसी) द्वारे ही गॅरंटी दिली जाते. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर 2016 रोजी केली होती. आपण देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

 

एज्युकेशन लोनसाठी दिली जाते गॅरंटी 
एनसीजीटीसीद्वारे एज्युकेशन लोनवर देखील गॅरंटी घेतली जाते. जर तुम्ही 7.5 लाखाचे लोन घेतले तर तुम्हाला कोलास्ट्रल सिक्यिुरिटी द्यायची गरज नाही किंवा थर्ड पार्टीची गॅरंटी द्यायची देखील गरज नाही. यासाठी क्रेडिट गॅरंटी फंड फाॅर एज्युकेशन लोन योजना तयार केली आहे, जिचं उद्दिष्ट 10 लाख लोकांना गॅरंटीमुक्त कर्ज देण्याचे आहे. 


स्कील डेव्हलपमेंटसाठी घ्या कर्ज 
जर तुम्हाला चांगल्या नोकरीसाठी स्कील  डेव्हलमेंट करण्याची आवश्यकता वाटत असेल आणि या साठी तुम्ही लोन घेणार असाल तर तुम्हाल देखी तारणाची गरज नाही. तुमची गॅरंटी सरकार घेईल. सरकारने क्रेडिट गॅरंटी फंड फाॅर स्कील डेव्हलमेंट लोनची सुविधा उपलब्ध केली आहे. याद्वारे एका वर्षात 10 ते 20 लाख लोकांना कर्ज दिले जाते. 

 

लहान व्यवसाय करायचा असेल तर 
जर तुम्हाला लहान व्यवसाय करायचा असेल तर आणि त्यासाठी लोन घेणार असाल तर तुम्हाला तारण देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही 10 लाखांपर्यंत बॅंक लोन घेऊ शकता याची गॅरंटी नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनी घेईल. 

 

पुढे वाचा एक कोटी पर्यंत घेऊ शकता लोन

 

 

बातम्या आणखी आहेत...