आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे अकाउंट उघडताच बदलेल तुमची दुनिया, प्रत्येक वर्षी व्हाल श्रीमंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. प्रत्येकाची पैसा कमविणे आणि पैसे वाचवून श्रीमंत होण्याची इच्छा असते पण यासाठी एक रणनीती तयार करुन नियमित पैसा गुंतवण्याचे काम मोजकेच लोक करतात. जे लोक हे काम करतात ते एक न एक दिवस सामान्य लोकांपेक्षा एक खास लीग मध्य सामावले जातात, ज्यांना आपण आर्थिक दृष्ट्या मजबूत आणि श्रीमंत म्हणून ओळखतो. आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची प्रक्रिया एक खास पाऊल उचलल्याने होते. काही लोक हे खास पाऊल उचलतात आणि श्रीमंत बनण्याच्या मार्गावर पुढे जातात तर काही लोक नेहमी फक्त प्लॅनिंग करत योग्य वेळेची प्रतिक्षाच करत राहतात. अशा लोकांची श्रीमंत होण्याची इच्छा कदाचितच पूर्ण होते. 

 


एसआयपी अकाउंट बदलेल तुमची दुनिया


स्वत: ला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे अनेक मार्ग आहेत पण या सर्वांसाठी एक काॅमन गोष्ट आहे ती म्हणजे गुंतवणुकीची सुरवात करणे. ती तुम्ही छोट्या किवा मोठ्या रकमेने करु शकता. ते तुमच्या इनकम वर अवलंबून आहे. सध्या सिस्टॅमॅटिक इन्व्हेसमेंट प्लॅनिंग म्हणजेच एसआयपी अकाउंट उघडणे ही मोठी सुरवात होऊ शकते. तुम्ही एसआयपी अकाउंट उघडून मंथली कमीत कमी 500 रुपए गुंतवू शकता. इथूनच तुमची दुनिया वेगळी होते. याशिवाय तुम्ही श्रीमंत बनण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू करता. 

 


वर्षानुवर्षे व्हाल श्रीमंत 
 

उदा : जर तुम्ही 2,000 रुपए प्रति महिना एक वर्षापर्यंत एसआयपी मध्ये गुंतवता तर तुमच्या खात्यात 24 हजार जमा होतात हीच गुंतवणूक दोन वर्षांपर्यंत वाढविली तर 50,000 जमा होतील. जर तुम्हाला या रकमेवर 10 ते 15 टक्के वार्षिक रिटर्न मिळाला तर तुमची गुंतवणुक आणि मिळणारा रिटर्न वाढत जाईल. जसा-जसा तुमच्या एसआयपी अकाउंटमध्ये पैसा वाढत जाईल तसं तुमचा स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आत्मविश्वास देखील वाढेल. 

 


आणखी वाचण्यासाठी पुढील स्लाइड वर क्लिक करा 

बातम्या आणखी आहेत...