आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAN द्वारे समजेल IT ची नोटीस येईल की नाही, असे करा चेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुमच्याकडे परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन असेल तर तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस येईल की नाही हे चेक करु शकता. तुमचं पॅन तुमची टॅक्स प्रोफाइल सांगते. केंद्र सरकार देखील तुमच्या नंबरच्या आधारेचे काही मिनिटांतच तुमचं टॅक्स प्रोफाइल चेक करुन तुम्ही टॅक्स रिर्टन भरता की नाही ये माहिती करुन घेते. सरकार या आधारे तुमचा इनकम किती आहे आणि तुम्ही टॅक्स चोरी करत नाही ना याची तपासणी करते. 


इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर करा चेक 
तुम्ही इनकम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट https://www.incometaxindia.gov.in वर तुमची टॅक्स रिटर्न प्रोसेसे पूर्णझाले आहे की नाही हे चेक करु शकता. जर तुमची रिटर्न प्रोसेस पूर्ण झाली नसेल तर इनकम टॅक्स विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. वेबसाईटच्या अॅक्सेससाठी तुमच्याकडे लाॅगइन आयडी आणि पासवर्ड असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर तुम्हाला वेबसाईटवर आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. 

 

चेक करु शकता इनकम टॅक्स रिटर्नचं रेकाॅर्ड 
वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचा कोणता इनकम टॅक्स पेंडिंग आहे की नाही हे चेक करू शकता. जर नियमानुसार इनकम टॅक्स रिटर्न जमा केला नसेल तर डिपार्टमेंट तुमंच रेकाॅर्ड चेक करेल आणि पेंडिग टॅक्स जमा करण्यासाठी तुम्हाला नोटीस पाठवू शकते. 


चेक करा इनकम आणि टीडीएस 
तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर  तुमचा फाॅर्म 26 एएस पण पाहू शकता. या फाॅर्म मध्ये तुमच्या पॅनच्या अगेन्स्ट किती इनकम वर किती टीडीएस कापला गेला आहे याचे विवरण असते. यावरुन तुम्हाला अंदाज येईल की तुमचा टीडीएस किती कापला आहे आणि तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल. 

 

बातम्या आणखी आहेत...