आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक करत असेल टाळाटाळ तर येथून घेऊ शकता मुद्रा लोन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी सरकारने दावा केला आहे की बेरोजगारी दूर करण्यामध्ये मुद्रा स्कीमने महत्त्वाची भूमिका निभावली आणि लाखो लोकांना रोजगार सुरु करण्यासाठी या योजने अंतर्गत लोन देण्यात आले. अजूनही सरकार जास्तीत जास्त लोकांना कर्ज देण्याच्या तयारीत आहे. परंतु काही बँका विशेषतः नवीन बिझनेस सुरु करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना लोन देण्यास टाळाटाळ करत आहेत. कदाचित तुम्हालाही मुद्रा लोन संदर्भात काही अडचणी आल्या असतील तर निराश होऊ नका. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, बँकेने मुद्रा लोक नाकारले तरी तुम्ही मुद्रा लोन घेऊन नवीन बिझनेस सुरु करू शकता.


यामागचे कारण म्हणजे सरकाने बँकांव्यतिरिक्त काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सला मुद्रा लोक देण्यासाठी अधिकृत केले आहे. याविषयी सामान्य लोकांना माहिती नसावी. आज आम्ही तुम्हाला त्या इंस्टिट्यूट विषयी सविस्तर माहिती देत आहोत.


सरकारी नाही या बँकेतून घेऊ शकता लोन...
सरकारने मुद्रा लोन घेण्यासाठी देशातील 27 सरकारी बँकांना अधीकृत केले आहे. यामध्ये जवळपास सर्व सरकारी बँकचा समावेश आहे परंतु सरकारी बँक लोन देण्यास टाळाटाळ करतात. यामुळे अशावेळी तुम्ही प्रायव्हेट बँकेशी संपर्क करू शकता. यामध्ये अॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, सिटी युनियन बँक, कॅथलिक सीरियन बँक, डिसीबी बँक, फेडरल बँक, इंडस इंड बँक, जम्मूकाश्मीर बँक, कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, नैनिताल बँक, साऊथ इंडियन बँक, तामिळनाडू मर्कंटाइल बँक, दि रत्नाकर बँक, आयडीएफसी बँक यांचा समावेश आहे.


पुढे वाचा, कोणत्या ग्रामीण बँक देऊ शकतात मुद्रा लोन...

बातम्या आणखी आहेत...