आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावातच सुरु करा हा व्यवसाय, महिन्याला मिळतील 25 हजार रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रोजगाराच्या शोधात शहराकडे जाणे ही बाब तशी फारशी नवी राहिलेली नाही. शहरांमधील बकालपणा आवडत नसल्याने अनेकांना आपल्या गावी राहणेच आवडते पण रोजगाराच्या संधी नसल्याने त्यांना शहराकडे पलायन करावे लागते. मोदी सरकारने आता बेरोजगार युवकांसाठी व्हिलेज लेव्हल एंटरप्रेन्‍योर्स (वीएलई) ही योजना आणली आहे. यात तुम्हाला जास्त गुंतवणूकही करावी लागत नाही. या केंद्राद्वारे तुम्ही महिन्याला 25 हजार रुपये कमावू शकता. चला जाणून घेऊ या योजनेविषयी...

 

 

काय आहे वीएलई योजना
- सरकार राष्ट्रीय ई-गवर्नस योजनेतंर्गत सगळ्या सरकारी सेवा कमी किंमतीत लोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अॅण्ड टेक्‍नोलॉजी देशभरात कॉमन सर्व्हिस सेंटर उघडत आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर ज्या युवकांना देण्यात येते त्यांना व्हिलेज लेव्हल एंटरप्रेन्‍योर्स म्हटले जाते. या केंद्रात तुम्ही सरकारी, खासगी आणि सामाजित क्षेत्रातील टॅलीकॉम, अॅग्रीकल्चर, हेल्थ, एज्युकेशन, एंटरटेनमेंट,  एफएमसीजी प्रॉडक्‍ट, बॅंकिंग आणि फायनॅशियल सर्व्हिस, सगळ्या पध्दतीची प्रमाणपत्रे, अर्ज आणि यूटिलिटी बिलचे पेमेंट केले जाते. सरकार या सेवा केंद्राद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांमध्येही वाढ करत आहे. उदाहरणादाखल या केंद्रातून तुम्ही विमा योजनाही विकू शकता. 

 

 

किती असेल इन्‍वेस्‍टमेंट
जर तुम्हाला सीएससी केंद्र उघडायचे असेल तर तुमच्याकडे 100 ते 150 वर्ग फुट जागा असायला हवी. सोबतच एक संगणक, एक प्रिंटर, डिजिटल/वेब कॅमेरा, जनसेट किंवा इन्वर्टर, सोलर पॅनल, ऑपरेटिंग सिस्टर आणि अॅप्लिकेशन सॉफ्टवे्र, ब्रॉडबॅन्ड कनेक्शन असायला हवे. यासाठी तुम्हाला 2 ते अडीच लाखाची गुंतवणूक करावी लागेल.

 

 

वीएलई होण्यासाठी काय करावे लागेल
वीएलई होण्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक असणे गरजेचा आहे. याद्वारे तुम्ही https://csc.gov.in वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. याच्या आधारावर तुम्हाला ओटीपी मिळेल. याद्वारे तुम्ही सीएससीसाठी ऑनलाइन अर्ज करु शकता. तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी ग्रामपंचायत आणि नगर पंचायत स्तरावर एका समितीचे गठन करण्यात येत आहे. तुम्हाला या समितीकडे अर्ज करावा लागेल. ते तुमच्या प्रपोजलचा अभ्यास करतील आणि तुम्हाला केंद्राची परवानगी देतील.

 

 

पुढे वाचा: कसा कमवाल पैसा

बातम्या आणखी आहेत...