आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या AC चे बिल 20% होईल कमी, रुममध्ये करावे लागतील हे छोटेसे बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. उन्हाळा सुरू होताच मोठ्या प्रमाणात AC च्या जाहिराती येऊ लागल्या आहेत. प्रत्येक कंपनी दावा करते की त्यांचा एसी सगळ्यात जास्त वीज वाचवतो, पण तुम्हाला हे माहिती आहे का जर तुमची रुम एसी लावण्यायोग्य नसेल तर वीज वाचवणे शक्य नाही. यामुळे रुममध्ये एसी लावण्याआधी हे माहिती करुन घेणे गरेजेचे आहे की काय केल्यानंतर वीज ही वाचेल आणि थंडावा देखील जास्त मिळेल.


AC लावण्याआधी या बाबी लक्षात असू द्या


रुमचा आकार 
 
रुमच्या आकारनुसारच AC घ्यावा .जर रुम लहान असेल तर जास्त क्षमतेचा एसी लावल्यावर त्याची क्षमता वाया जाईल आणि कमी क्षमतेचा असेल तर वीज जास्त लागेल आणि कुलिंग देखील व्यवस्थित होणार नाही. 


रुम मध्ये कमी सामान ठेवा
 
AC रुममध्ये जे सामान आहे त्यालाही थंड करत असतो, त्यामुळे रुममध्ये जेवढं कमी सामान असेल तेवढं चांगलं असतं.


रुममध्ये वीज उपकरणांवर लक्ष असू द्या 

काही वीज उपकणे जास्त उष्णता निर्माण करता. त्यामुळे रुममध्ये अशी उपकरणे आहेत का याची खात्री करा. उजेडासाठी अन्य बल्ब किंवा टयूब एेवजी LED वापरला तर फायदा होईल. 
 

 

खिडक्या कशा आहेत ?

 

रुममध्ये जास्त खिडक्या असतील तर कुलिंगवर देखील परिणाम होईल, यामुळे खिडक्या कमी असणा-या खोलीतच एसी लावावा. जह हे शक्य नसेल तर या खिडक्या इंसुलेटेड करणे गरजेचे आहे. यामुळे सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणा-्या उष्णतेचा प्रभाव कमी होईल आणि एसी देखील चांगल्या प्रकारे काम करेल, ज्यामुळे वीजही कमी पावरली जाईल.
खोलीतील सूर्यप्रकाश कसा आहे. 
 
 
रुममध्ये कसा आहे सूर्यप्रकाश 

 

ब-्याच घरांमध्ये जास्त सूर्यप्रकाश असणा-्या रुममध्ये एसी लावलेले असतात. यामुळे एसीच्या काॅम्प्रेसरवर जास्त ताण येतो. यामुळे वीज जास्त लागते. पण आपण घरातील भिंती बदलू नाही शकत पण यात सुधारणा केली जाऊ शकते. भिंतींवर कोटेड पेंट लावला जाऊ शकतो, यामुळे सूर्यप्रकाश आत येणार नाही आणि उत्तम कुलिंग मिळेल शिवाय वीजबिल देखील कमी येईल. 

 


विंडो आणि स्प्लिट AC कुठे लावाल 

 

कोणताही AC असो तो त्यावर ऊन येणार नाही अशा ठिकाणी लावला पाहिजे. जर असं केलं तर त्याच्या कुलिंग वर निश्चितच फरक पडेल. त्यामुळे जेव्हा एसी लावाल तेव्हा ही गोष्ट लक्षात असू द्या. जर हे शक्य नाही तर एसीवर कमी सूर्यप्रकाश पडण्याची व्यवस्था करा. यामुळे देखील वीज बिल कमी येऊ शकते.  

 

पुढे वाचा AC खरेदी करताना काय काळज्या घ्यावी. 

बातम्या आणखी आहेत...