आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयडिया आवडली तर होऊ शकता Cipla चे बिझनेस पार्टनर, 17 जून पर्यंत करा अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत सरकारच्या स्‍टार्ट अप इंडिया मोहिमेचे पार्टनर सिप्लाने एक मोहिम सुरु केली आहे. ग्लोबल फार्मा कंपनी सिप्लाने युवकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना मागविल्या आहेत. या कल्पना हेल्थ केअरवर आधारित आहेत. जर तुमच्याजवळ कोणती आयडिया असेल जी अधिक सुलभ आणि रुग्णाला सुखावणारी असेल तर तुम्ही या योजनेत अर्ज करु शकता. तुमची आयडिया सिप्लाला आवडल्यास सिप्ला तुम्हाला तीन पध्दतीने मदत करेल आणि तुम्ही सिप्लाचे बिझनेस पार्टनरही होऊ शकता. 

 

 

व्यवसायात करेल सिप्ला मदत
जर सिप्लाला वाटले की तुमची आयडिया यूनिक आहे आणि तुमच्या आयडियावर आधारित बिझनेस होऊ शकतो तर सिप्ला तुम्हाला या कामात पूर्ण मदत करेल. सिप्लाच्या वतीने तुम्हाला मेंटरशिप प्रदान करण्यात येईल. या अंतर्गत तुम्हाला इंडस्ट्री गुरु आणि अनुभवी व्यक्तींकडून तुम्हाला हेल्थकेअर आणि बिझनेसचे बारकावे समजुन सांगण्यात येतील.

 

 

फंडिग करेल सिप्ला
आपली आयडिया आवडल्यास सिप्ला केवळ बिझनेसमध्ये पैसा गुंतवणार नाही. तर वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शनही करेल.. त्यामुळे तुम्ही मजबूत प्लॅटफॉर्म तयार करु शकता आणि तुमचा व्यवसाय वाढेल. 

 

 

सिप्लासोबत पार्टनरशिपची संधी
सिप्ला तुम्हाला पार्टनरशिपची संधी देऊ शकते. त्यामुळे तुमचा व्यवसाय सातत्याने वाढेल आणि बिझनेस आयडिया तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल. 

 

 

पुढे वाचा: कुठे आणि कसा कराल अर्ज...

बातम्या आणखी आहेत...