आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक बिटकॉइन 11,150 डॉलरचा, भारतात गेला 8.5 लाख रुपयांवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- डिजिटल चलन बिटकॉइनचे मूल्य बुधवारी एकाच दिवसात आधी १०,००० आणि नंतर ११,००० डॉलरच्या वर गेलेे. डिजिटल क्रिप्टो चलनाची माहिती देणाऱ्या कॉइनमार्केटकॅप डॉट कॉमवर सायंकाळी एका बिटकॉनची किमत ११,१५० डॉलर (७.२५ लाख रुपये) वर पोहोचली. मंगळवारी ९,६२४ डॉलरच्या तुलनेत याची किमत सुमारे १६ टक्क्यांनी वाढली आहे. याच वर्षी जानेवारीमध्ये बिटकॉनची किमत ७५० डॉलरच्या जवळपास होती. अकरा महिन्यात या ‘डिजिटल गोल्ड’ची किंमत सुमारे १५ पटीने वाढली आहे. बिटकॉइनची चलनाची सुरुवात २००९ मध्ये झाली होती. 

 

त्या वेळी याची किंमत एक डॉलरही नव्हती. भारतात जेबपे, कॉइनसेक्योर, युनोकॉइनसारख्या शेअर बाजारात याची ट्रेडिंग होते. बुधवारी यावर एक बिटकॉइनची खरेदी करण्याचा दर ८.४२ लाख ते ८.७९ लाख रुपये आणि विक्रीचा दर ८ लाख ते ८.६२ लाख रुपयांपर्यंत होता.  


जगातील कोणत्याही मान्यताप्राप्त शेअर बाजारात बिटकॉइनची ट्रेडिंग होत नाही. खासगी शेअर बाजारच यामध्ये ट्रेडिंग करतात. शिकागोमध्ये असलेल्या सीएमई समूहाने त्यांच्या शेअर बाजारात याची फ्यूचर ट्रेडिंग सुरू करण्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात या घोषणेनंतर बिटकॉनचे मूल्य तेजीने वाढले आहे. आठवड्याभरात याच्या किमतीत सुमारे ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकाही देशाने किंवा केंद्रीय बँकेने याला मान्यता दिलेली नाही तरीदेखील वस्त्ूंची विक्री आणि खरेदी करण्यामध्ये याचा वापर होत आहे. मात्र, ही गुंतवणुकीची संधीऐवजी “बुडबुडा’ असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बुडबुडा ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

 

भारतचे ‘लक्ष्मी’ डिजिटल चलन  
भारतात रिझर्व्ह बँकेने अशा चलनाला मान्यता दिलेली नाही. मात्र, सरकार ‘लक्ष्मी’ नावाने डिजिटल चलन आणण्याचा विचार करत आहे. यासाठी रिझर्व्ह बँक, सेबी, सीबीईसी  अधिकाऱ्यांची समिती बनवण्यात आली आहे.   

 

 

ट्रेडिंगच्या संख्येत तीनपट वाढ  
बिटकॉइनची ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठा प्लॅटफॉर्म कॉइनबेस आहे. बीस्पोक इन्व्हेस्टमेट समूहानुसार एका वर्षात यावरील नोंदणीकृत खात्यांची संख्या तीनपट वाढून १.३ कोटी झाली आहे.  

 

बिटकॉइनचा मोठा मार्केट कॅप  
बिटकॉइन, इथेरियम, रिपल, लाइटकॉइन, डॅश, मोनेरोसारखे डिजिटल चलन आहेत. या सर्वांचा मार्केट कॅप २२ लाख कोटी रुपयांचा आहे. यात बिटकॉइनचा मार्केट कॅप १२ लाख कोटी रुपयांचा आहे.

 

 सॉफ्टवेअर कोड आहे बिटकॉइन, २००९ मध्ये सुरुवात
बिटकॉइन एक प्रकारे सॉफ्टवेअरचा कोड आहे. यात ब्लॉक चेन तंत्राचा वापर होतो. यात रिकॉर्ड््सच्या ब्लॉकची चेन बनवण्यात येते. प्रत्येक ब्लॉकमध्ये एक डाटा - सेट होतो. हा ऑनलाइन लेझर वर रिअल टाइम अपडेट होत राहतो. सातोषी नाकामोतो नावाच्या व्यक्तीने २००८ मध्ये पहिला ब्लॉक चेन बनवला असल्याचे मानले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर आता भारतीय बँका करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...