आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीए Girl ने HRची नोकरी सोडून रस्त्यावर सुरु केले स्वत:चे फूड कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- 'ऐकावे जणाचे करावे मनाचे', या म्हणीचा प्रत्यय नुकताच हरियाणात आला. राधिकाने एचआरची तगड्या पगाराची नोकरी सोडून चक्क रस्त्यावर ठेला सुरु केला आहे. राधिकाने स्वत:चे फूड कोर्ट सुरु केले आहे. उल्लेखनिय गोष्ट म्हणजे, राधिकाने एमबीए केले आहे. ती रिलायन्स कंपनी एचआर म्हणून कार्यरत होती. तिने ही नोकरी सोडून स्वत:चा बिझनेस सुरु केला आहे. राधिकाने आपल्या फूड कोर्टला 'माँ का प्यार फूड कोर्ट' असे नाव दिले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, राधिकाच्या फूड कोर्टवरील मेन्यू कार्ड ..?

काय आहे मेन्यू व टाइम...?
- राधिकाच्या 'माँ का प्यार फूड कोर्ट'वर घरच्यासारखे जेवण मिळते. त्यात राजमा-भात, कढी भात, डाळ-भात व भाजी-पोळीचा समावेश आहे.
- मोहाल इंडस्ट्रियल एरियात राधिका दररोज दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान आपले फूड कोर्ट सुरु ठेवते.

पुढील स्लाइडवर वाचा, बीकॉमनंतर चंडीगडमध्ये आली राधिका...

बीकॉमनंतर चंडीगडमध्ये आली राधिका...
- अंबालाची राहाणारी राधिका अरोराने आपल्या ठेल्याला 'माँ का प्यार फूड कोर्ट' असे नाव दिले आहे.
- राधिकाने बीकॉमनंतर एचआरमध्ये एमबीए केले. एमबीएदरम्यान ती एका कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून राहात होती.
- राधिकाला तेथील जेवण मात्र रुचत नव्हते.
- राधिकाने रिलायन्समध्ये जॉब केला. पण तिथेही तिला जेवणात हवी तशी टेस्ट मिळाली नाही.
- राधिकाला आईच्या हातच्या जेवणाची कायम आठवण येत होती. यातून राधिकाला चाकरमान्यांना घरून जेवणाचे डब्बे पोहोचवण्याची आयडीया सुचली.

पुढील स्लाइडवर पाहा, राधिकाच्या 'माँ का प्यार फूड कोर्ट'चे फोटोज

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...