आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 कोटी 40 लाख रुपये Salary, असा मिळावा Facebookमध्ये JOB

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी अंजलीसोबत अभिषेक मालू - Divya Marathi
पत्नी अंजलीसोबत अभिषेक मालू
भीलवाडा/जयपूर- करिअरसाठी नेहमी धडपड करणारा भीलवाडा येथील एका होतकरु युवक थेट अमेरिकेत चमकला आहे. अमेरिकेत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोशल साइट 'फेसबुक'मध्ये तो कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजवर सध्या नोकरी करत आहे. अभिषेक मालू असे या युवकाचे नाव आहे.

अभिषेकचे आई-वडील भीलवाडा येथे राहातात. आई शिक्षिका असून त्याचे वडील बीएसएल कंपनीत नोकरी कार्यरत आहेत.

भीलवाडा येथील एमएलव्ही टेक्सटाइल अॅण्ड इंजीनियरिंग कॉलेजमधून अभिषेक याने बीटेकची पदवी प्राप्त केली आहे. अभिषेक आज फेसबुकमध्ये 'सीनियर सॉफ्टवेयर इंजीनियर' पदावर कार्यरत आहे. मागील एक वर्षापासून तो 'फेसबुक'मध्ये कार्यरत आहे. त्याला 2 कोटी 40 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज आहे.
अभिषेक भीलवाडा येथील टेक्सटाइल कॉलेज अॅल्युमिनी असोसिएशनचा सदस्य देखील आहे. मागील वर्षी कॉलेजमध्ये अॅल्युमिनी असोसिएशनशी संपर्क करून गरजू विद्यार्थ्यांसाठी त्याने स्कॉलरशिप देण्याचा प्रस्ताव दिला होता. असोसिएशन सेक्रटरी एवं कॉलेजचे आयटीचे असिस्टेंट प्रोफेसर अनुराग जागेटिया यांनी अभिषेकचा प्रस्ताव स्विकारला आहे.
नोएडामधील सीएससी कंपनीतून करियरला सुरुवात...
अभिषेकने 2006 मध्ये टेक्सटाइल कॉलेजमधून आयटी विषयात बीटेक केले. अभिषेकने नोएडा येथील सीएससी कंपनीतून आपल्या करियरला सुरुवात केली. 2010 मध्ये त्याने ही नोकरी अर्ध्यात सोडून 'मास्टर ऑफ सायन्सचे (एमएस) शिक्षण घेण्यासाठी अमेरिका पोहोचला. अमेरिकेतील सेन जोसे स्टेट यूनिव्हर्सिटीतून त्याने एमएसची पदवी प्राप्त केली. दोन वर्षानंतर त्याला फेसबुकने ऑफर दिली. अभिषेक सध्या कॅलिफोर्नियातील फेसबुक ऑफिसमध्ये कार्यरत आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, अभिषेकचे निवडक फोटो...