नवी दिल्ली- भारतीय मायनिंग कंपनी अदानीला ऑस्ट्रेलिया सरकारच्या वतीने कारमाइकल कोळसा खदान आणि रेल्वे प्रकल्पाला पुन्हा मंजुरी मिळाली आहे. पर्यावरणाबाबत मुद्द्यांमुळे या प्रकल्पाची मंजुरी रद्द करण्यात आली होती.
अदानीची वीज रेल्वेला:
अदानी पॉवर भारतीय रेल्वेला ३.६९ रुपये प्रतियुनिटच्या दरानुसार तीन वर्षांपर्यंत ५० मेगावॅट वीज देणार आहे. यासाठी उत्तर मध्य रेल्वे आणि अदानी पॉवर यांच्यात गुरुवारी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे रेल्वेची वर्षाकाठी जवळपास १५० कोटी रुपयांची बचत होणार आहे.