नवी दिल्ली- सरकारी बँकांत खाते उघडण्यासाठी आणि ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी आता आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरपूर्वी हा क्रमांक बँकेत दाखल करावा लागेल. अन्यथा हे खाते अवैध घोषित करून बंद केले जाईल.
दोन्ही निर्णय १ जूनपासून लागू करण्यात आले आहेत. मात्र, याची अधिसूचना शुक्रवारी काढण्यात आली. आधार क्रमांक नसेल तर आधार नोंदणी क्रमांकासोबत वाहन परवाना, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड इत्यादी सादर करावे लागेल.
- रॉकेल सबसिडी व अटल पेन्शनसाठी आधार बंधनकारक केले आहे. याच्या नोंदणीसाठी ३० सप्टेंबर अंतिम तारीख आहे.
- प्राप्तीकर रिटर्नसाठीही आधार सक्तीचा केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.