आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Aditya Birla Grup Chairman Kumar Manglam\'s Interview On Demonetization Decesion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी धाडसी पाउल, नकारात्मक परिणाम होणार नाही - कुमार मंगलम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदी च्या निर्णयासह उभे आहेत. ते सांगतात की हे सरकारचे एक बोल्ड धाडसी पाऊल आहे. आणि लवकरच लोकांना याचे फायदे दिसतील. सोमवारी द संस्कार व्हॅली स्कूलच्या १० व्या स्थापना दिवस समारंभास आलेले बिर्ला यांच्याशी भास्करची झालेल्या बोलण्यातील मुख्य गाभा.....
नोटबंदीच्या निर्णयाने मंदी येऊ शकते काय?
मला तसे वाटत नाही याचा अर्थव्यवस्थेवर काही नकारात्मक परिणाम होईल. प्रारंभी अडचणी येतील. त्या लवकरच दुरुस्त होतील. जीडीपीत काही महिन्यानंतर सुधारणा येईल.
निर्णय घेण्यात सरकारने खूप घाई केली काय?
हा मोठा निर्णय होता. यास गोपनीय ठेवणे महत्वपूर्ण होते. तयारी केली असती तर ते गोपनीय राहीले नसते. मोठे निर्णय असेच लागू होतात. प्रत्येक अर्थव्यवस्थेची आपली काही वैशिष्ठ्ये असतात. आमची अर्थव्यवस्थेत रोख अधिक आहे. एव्हढी रोख(कॅश) योग्य नव्हती. हे पंतप्रधानांचे खुपच धाडसी पाऊल आहे.

मनमोहन सिंह यांचे म्हणणे आहे यामुळे विकास दर २ टक्के पर्यंत खाली येईल?
मला माहीत नाही की, विकास दर एक टक्के पडेल वा दोन टक्के. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, येणाऱ्या वर्षांत याचे परिणाम चांगलेच असतील आणि ते सर्वांसमोर असतील.
गावांतील ७० टक्के लोक कॅशलेस होऊ शकतील?
गावांतही आता लोक टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत. लवकरच पेैसे देण्या-घेण्यातही याचा वापर वाढेल. कॅशवरुन प्लास्टीक मनी कडे जाणे हा मोठा बदल आहे. हे लागू होण्यास थोडा वेळ तर लागेलच.

पंतप्रधान म्हणतात की, कॅश चा उपयोग कमी करा. यामुळे तर खर्चही घटेल-कमी होईल.
गरजेच्या वस्तूंच्या मागणीवर काही विशेष परिणाम नाही पडणार. लोक डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, पेमेंट बॅंक आदीकडे वळतील. आता कंपन्यांवर कोणताही परिणाम दिसत नाहीये.

नोटबंदीचा प्रायव्हेट सेक्टर वर काय परिणाम होईल?
मला नाही वाटत की, नोटबंदीच्या कारणामुळे कोण्या मोठ्या कंपनीने कर्मचारी काढले आहेत. एल अॅण्ड टी च्या बाबतही जे बोलले जात आहे तो गेल्या सहा महिन्यातील आकडा आहे. कदाचित कंपनीत राईटसायजिंग च्या कारणामुळे हे केले असेल.
स्टॉक मार्केट वर तर परिणाम दिसत आहे?
ही प्रारंभीची समस्या आहे आणि ती ही राष्ट्रीय. जसे ही लोकांना याच्या फायद्याबाबत कळेल तेव्हा स्टॉक मार्केट मध्येही सुधारणा होईल. मला वाटते आहे मार्केट कॅप ची स्थिती येणाऱ्या काही महिन्यात सुधारुन जाईल.
बातम्या आणखी आहेत...