आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aditya Birla Purchased To Jubilant Retel Latest News In Marathi

'टोटल': आदित्य बिर्ला ज्युबिलेंट रिटेल खरेदी करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कुमारमंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील बिर्ला समूह रिटेल व्यवसायात आपली पकड मजबूत करण्यासाठी आक्रमक रणनीती अवलंबत आहेत. समूहाची कंपनी आदित्य बिर्ला रिटेलने ज्युबिलेंट इंडस्ट्रीजच्या टोटल हायपरमार्केट व्यवसाय अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे.
या व्यवहाराची चर्चा दोन महिन्यांपासून होती. मात्र, मंगळवारी त्याची औपचारिक घोषणा झाली. कंपन्यांनी व्यवहाराची माहिती जाहीर केली नाही. दहा दिवसांपूर्वी आदित्य बिर्ला समूहाने आपला अपॅरल बिझनेस एकत्र करण्याची घोषणा केली होती. बंगळुरूमध्ये चार हायपरमार्केट स्टोअर आदित्य बिर्ला रिटेल अधिग्रहण करणार असल्याचे ज्युबिलेंट इंडस्ट्रीजने म्हटले आहे. यामध्ये हायपरमार्केटचे कर्मचारी, परवाने आदींचा समावेश असेल. ज्युबिलेंट इंडस्ट्रीजच्या पूर्ण मालकीच्या ज्युबिलेंट अॅग्री अँड कंझ्युमर प्राॅडक्ट्सची मंजुरीही आदित्य बिर्लाकडे सोपविली जाईल.
ज्युबिलेंटचा जवळपास १० वर्षे जुना रिटेल व्यवसाय टोटल सुपरस्टोअर नावाने चालतो. त्याचे क्षेत्र २.८७ लाख चौ.फूट फुटप्रिंट एवढे आहे. या स्टोअर्सचा वार्षिक महसूल साधारण ४७० कोटी रुपये आहे. आदित्य बिर्ला म्हणाले की, टोटल सुपरस्टोअर बिझनेसच्या सर्व चल-अचल संपत्तीचे ते अधिग्रहण करणार आहेत. चार महिन्यांत व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आदित्य बिर्ला रिटेलचे देशभरात मोर नावाने ५००० सुपरमार्केट आणि १६ हायपरमार्केट आहेत. त्यांनी २००७ मध्ये दक्षिणेतील त्रिनेत्र सुपर रिटेल कंपनीच्या अधिग्रहणाचे काम सुरू केले होते.
दहा दिवसांत दोन विलीनीकरण : ३ मे रोजी आदित्य बिर्ला समूहाने वेगवेगळ्या कंपन्यांत विस्तारलेले अपॅरल बिझनेस एकत्र करून "आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड' (एबीएफआरएल) नावाच्या कंपनीची घोषणा केली. त्याचा महसूल जवळपास ६ हजार कोटी रुपये असेल. दुसऱ्याच दिवशी किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्यूचर व राजन मित्तल यांच्या भारती समूहाने रिटेल बिझनेसच्या विलीनीकरणाची घोषणा केली.