आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतंजलीच्या सर्व जाहिराती इतर कंपन्यांबाबत गैरसमज वाढवणाऱ्या, अहवालात दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत. यामध्ये प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या उत्पादनाला चुकीच्या पद्धतीने बदनाम करण्यात आले असल्याचे जाहिरातींचे नियमन करणारी संस्था भारतीय जाहिरात मानक परिषदेने (एएससीआय) म्हटले आहे. जाहिरात नियामकच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या एप्रिल महिन्यातील अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये अनेक कंपन्यांच्या विरोधातील ६७ तक्रारी योग्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

परिषदेने “कच्चे घानी का सरसो तेल’ या पतंजलीच्या जाहिरातीचे उदाहरण दिले आहे. या जाहिरातीमध्ये इतर कंपन्या “सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन’ प्रक्रिया करून भेसळयुक्त तेल विकत असल्याचा आरोप करण्यात अाला आहे. या तेलात न्यूरोटॉक्सिन असल्याचेही जाहिरातीत सांगण्यात आले आहे. मात्र, ही जाहिरात सत्यस्थितीवर अधारीत नसल्याचे मत या अहवालात नमूद करण्यात आले आहे. इतकेच नाही तर पतंजलीच्या वतीने उगाचच वाढवून करण्यात आलेल्या या दाव्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत असल्याचेही परिषदेने स्पष्ट केले आहे.
पतंजली आपल्या फळांच्या ज्यूसच्या जाहिरातीत करण्यात आलेला दावा सिद्ध करण्यात अपयशी ठरली आहे. इतर कंपन्यांच्या ज्यूसमध्ये “पल्प’ असूनदेखील ते महाग असल्याचा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता. या पद्धतीने प्रत्येक प्रकारच्या उत्पादनांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

पाळीव प्राण्यांच्या संदर्भातील चारा “दुग्धामृत’संबंधी दावादेखील सिद्ध करण्यात बाबा रामदेव यांची कंपनी अपयशी ठरली आहे. या जाहिरातीत दावा करण्यात आला होता की, इतर कंपन्यांच्या चाऱ्यामध्ये तीन ते चार टक्के युरिया आणि इतर अखाद्य पदार्थ मिसळलेले असतात.
पतंजली आयुर्वेद “दंतकांती’ टूथपेस्टच्या जाहिरातीमध्ये दावा करण्यात आला होता की, या पेस्टमुळे पायोरिया, हिरड्यांवरील सूज, रक्त येणे, पिवळे दात, सेन्सिटिव्हिटी आणि श्वसनातील दुर्गंध दूर होते. मात्र, आपला हा दावाही पतंजली सिद्ध करू शकली नाही, असे परिषदेने आपल्या अहवालात सांगितले आहे.
रिलायन्ससह इतर मोठ्या कंपन्यांवरही टीका
एएससीआयने निसान, टाटा मोटर्स, अॅमेझॉन, कोलगेट-पामोलिव्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयडिया सेल्यूलर आणि रिलायन्स इन्डस्ट्रीज सारख्या मोठ्या कंपन्यांवरही टीका केली आहे. निसानने “सनी’च्या जाहिरातील चालकाला फोनवर बोलताना, चुकीच्या बाजूने (राँड साइड) गाडी चालवताना आणि सीट बेल्ट न लावलेेला दाखवले आहे. अपोलो टायर्सने दुचाकी चालकाला फुटपाथवर गाडी चालवताना दाखवले आहे. रिलायन्सच्या जाहिरातीत सांगण्यात आले की, २०१६-१७ मध्ये रिलायन्स जियो “कमर्शियल ऑपरेशन’चे एक वर्ष पूर्ण करेल, मात्र, आतापर्यंत ते सुरूच झालेले नाही. सुझुकी मोटारसायकलने “गिक्सर’च्या जाहिरातीत १९ पुरस्कार मिळाल्याचे दाखवले असून त्यांना फक्त सहा पुरस्कार मिळालेले आहेत.
कायदेशीर उपायांचा विचार
एएससीआयच्या अहवालाचा अभ्यास सुरू अाहे. काही कायदेशीर उपायांचादेखील विचार सुरू असल्याचे या संदर्भात पतंजली आयुर्वेदच्या वतीने सांगण्यात आले आहे. परिषदेच्या वतीने मे महिन्यातील अहवालातही पतंजलीच्या केसांचे तेल आणि वाॅशिंग पावडरसंबंधी जाहिरातीला चुकीचे आणि दिशाभूल करणारी ठरवले होते.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...